Monday , September 21 2026
Breaking News

बेळगुंदी येथे 1 फेब्रुवारी रोजी डॉ. उमा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन

Spread the love

 

बेळगाव : बेळगुंदी येथे रविवार दि. 1 फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे हे संमेलन एकूण चार सत्रामध्ये होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षा डॉ. उमा कुलकर्णी या भूषविणार आहेत. असे संयोजकांकडून घोषित करण्यात आले आहे. मराठी साहित्यातील एक प्रमुख अनुवादक ज्यांनी कन्नड साहित्याचे अनेक उत्तम अनुवाद मराठीत केले आहे त्यांचे अनुवाद कार्य कन्नड साहित्य मराठी वाचकापर्यंत नेते ज्यात ज्ञानपीठ विजेते लेखकांचे साहित्य समाविष्ट आहे. त्यांना साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांची इतर स्वलिखित साहित्य सुद्धा प्रकाशित झाले आहेत, पण त्या स्वतः जास्त अनुवादक साहित्य मध्येच रमलेल्या आहेत. यांचा अनुवादातील दृष्टिकोन लेखकाच्या शैली व संस्कृतीला प्राधान्य देणारा आहे. अनुवाद ही विचारपूर्वक प्रक्रिया असून मूळ कृतीचा शुद्ध अर्थ वाचकापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेळगाव येथील सरस्वती विद्यालय, शहापूर येथे झाले आहे त्या मूळच्या बेळगावच्या असून सध्या पुणे येथील रहिवासी आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *