Monday , September 21 2026
Breaking News

किणये कब्बड्डी स्पर्धेत पुरुष बैलहोंगल तर महिला बेळवट्टी संघाचे विजय

Spread the love

 

बेळगाव : पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या नरवीर तानाजी युवक मंडळ किणये ता. बेळगाव येथे आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात बैलहोंगल प्रथम व द्वितीय तर महिला गटात बेळवट्टी संघ प्रथम तर बालिका आदर्श देसुर संघ द्वितीय क्रमांक पटकावला.

सामाजिक कार्यकर्ते अशोक घागवे व सुवर्णकार राजू बेकवाडकर, डॉ.कृष्णा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती डुकरे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके व कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सुरज जाधव, राजू पाटील, महेश डुकरे यांची उपस्थिती लाभली.

मंडळाचे अध्यक्ष गुरव सर, अनिल पाटील, कृष्णा पाटील, रामलिंग गुरव, शिवाजी पाटील यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *