Monday , September 21 2026
Breaking News

हिंडलगा कारागृहास मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची भेट

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव मधील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आणि अमली पदार्थ पुरविल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष श्याम भट्ट यांनी बुधवारी कारागृहास अचानक भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

कारागृहाच्या सुरक्षा भिंतीवरून अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित वस्तू आत फेकल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. या गंभीर घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अध्यक्ष श्याम भट्ट यांनी कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती यांच्याशी चर्चा करून प्रतिबंधित वस्तू आत कशा पोहोचतात, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला. तसेच कैद्यांना मिळणारे जेवण आणि मूलभूत सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.

यावेळी आयोगाचे सदस्य एस. के. वंटगुडी यांनी कारागृहातील शिस्तीचे आणि कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कारागृहात सध्या कैद्यांसाठी पोषक वातावरण असून कोणत्याही गंभीर त्रुटी आढळल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अधिकारी एफ. यू. पुजेरी आणि तहसीलदार बसवराज नागराळ उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. कारागृहाभोवतीची सुरक्षा अधिक कडक करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशा सूचना आयोगाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *