Monday , April 20 2026
Breaking News

पोलिसांनी विवस्त्र करुन केली मारहाण, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Spread the love

 

हुबळी : हुबळी जिल्ह्यात एका भाजपा महिला कार्यकर्त्याला अटक करताना तिचे कपडे फाटल्याचा तसेच तिच्यावर हल्ला झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत एका बसमध्ये पोलीसांच्या गराड्यात एक महिला दिसत आहे. भाजपाची कार्यकर्ता असलेल्या महिलेवर पोलिसांनी हल्ला केला, तिचे कपडे फाडले असा आरोप कर्नाटकातील भाजपाने केला आहे.

दरम्यान, महिलेने पोलिसांना विरोध करत तिचे कपडे काढण्यास सुरूवात केली होती, त्यावेळी बसमधील महिला पोलिसांनी तिचे कपडे व्यवस्थित केले, अशी माहिती दिली आहे. महिलेबरोबर गैरवर्तन झाल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत.

एसआयआर सर्वेक्षणावेळी झाला होता वाद
हुबळीचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. भाजपाच्या कार्यकर्ता असलेल्या महिलेवर यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात ५ जानेवारी रोजी पोलीस तिला अटक करत होते. तेव्हाचा तो व्हिडीओ असल्याचे शशीकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, “भाजपा कार्यकर्ता असलेली महिला हुबळीतील चालुक्यनगर भागात मतदार फेरतपासणीसाठी (SIR) सर्वेक्षणाला गेली होती. तिच्याबरोबर सर्वेक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी होते. तिथे असलेल्या स्थानिक नेत्यांनी एसआयआर सर्वेक्षणाला विरोध केला. दोन गटांत वाद झाल्यानंतर हाणामारी झाली. त्यानंतर संबंधित महिलेवर तीन गुन्हे दाखल झाले होते.”

“महिला पोलिसांनी तिचे कपडे व्यवस्थित केले”
पोलीस आयुक्त शशी कुमार पुढे म्हणाले, “त्या घटनेनंतर महिलेवर तीन गुन्हे दाखल झाले होते. खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तिला ५ जानेवारी रोजी अटक करण्यासाठी पोलीस गेले. तेव्हा तिने व तिच्याबरोबर असलेल्या काही लोकांनी पोलिसांना विरोध केला. तसेच पोलिसांवर हल्लाही केला. तिने एका पोलीस उप निरीक्षकाला चावादेखील घेतला.” पोलिसांनी तिला अटक करून बसमध्ये नेल्यानंतर तिने कपडे काढण्यास सुरूवात केल्याचे पोलीस आयु्क्त शशी कुमार म्हणाले. “महिलेने कपडे काढण्यास सुरूवात केल्यानंतर महिला पोलिसांनी तिचे कपडे व्यवस्थित केले. तिच्या अंगावर कपडे व्यवस्थित आहेत, याची त्यांनी खातरजमा केली.”, असे कुमार म्हणाले.

महिलेवर नऊ गुन्हे दाखल
दरम्यान, भाजपाची कार्यकर्ता असलेल्या महिलेवर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यातील पाच गुन्हे २०२४ मध्ये तर चार गुन्हे नव्याने दाखल झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनीही संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. “पोलिसांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केल्याचे वृत्त चुकीचे आहे”, असे पोलीस आयुक्त कुमार म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *