Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव-म्हैसूर दरम्यान विशेष ट्रेन धावणार

Spread the love

 

 

बेळगाव : संक्रांती उत्सव आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण- पश्चिम रेल्वेने म्हैसूर आणि बेळगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या तीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हैसूर-बेळगाव विशेष ट्रेन (क्रमांक ०६२८५): ही १३, १६ आणि २३ जानेवारी रोजी रात्री ८:४० वाजता म्हैसूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता बेळगावला पोहोचेल.

बेळगाव-म्हैसूर विशेष ट्रेन (क्रमांक ०६२८६): ही १५, १८ आणि २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ५:३० वाजता बेळगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१५ वाजता म्हैसूरला पोहोचेल.

या गाड्या मंड्या, केएसआर बेंगळुरू, यशवंतपूर, तुमकूर, अर्सिकेरे, कदूर, चिक्काजाजूर, दावणगेरे, हरिहर, एसएसएस हुबळी, धारवाड, अळनावर, लोंढा आणि खानापूर स्थानकावर थांबेल.

या विशेष ट्रेनला एकूण 23 डबे असतील. यामध्ये एसी 2-टायर कम एसी 3-टायर (1), एसी 3-टायर (3), स्लीपर क्लास (13), जनरल सेकंड क्लास (4) आणि SLR/D (2) कोच असतील.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *