Sunday , July 26 2026
Breaking News

कुन्नूरमधील सद्गुरू बाळूमामा कुन्नूरकर महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उत्तम पाटील यांची भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कुन्नुर येथील बिरदेव मंदिरात सुरू असलेल्या सद्गुरू बाळूमामा कुन्नूरकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेऊन महाराजांना अभिवादन केले.
यावेळी धनगर समाजातील मान्यवर व ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त करून संत परंपरेच्या विचारांना कृतीत उतरवून समाजाशी नाते अधिक दृढ करण्याचे कार्य कुन्नूर मध्ये सुरू आहे. अशा धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांतून मनाला शांती आणि समाधान वाटत असल्याचे सांगितले. यावेळी रामचंद्र कुलकर्णी- महाराज, रामचंद्र चेंडके, ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सदस्य चेतन चेंडके, विलास पाटील, रवी मगदूम, धोंडीराम धनगर, शिवाजी निकम, विजय हेगडे, माणिक कांबळे, मानाजी चेंडके, संतोष कोळी, पोपट जाधव, राजू कोळी, जितेंद्र चेंडके, वरूण कुलकर्णी, महादेव कुलकर्णी, चेतन मगदूम, रामचंद्र करडे, सुनील तावदारे, दिग्विजय पाटील, तात्यासाहेब कुलकर्णी, मधुकर धनगर, अनिल संकाण, राजू मगदूम, मीनाक्षी तावदारे, साताप्पा धनगर, आण्णासाहेब धनगर, आण्णासाहेब बन्ने, मारुती धनगर, सुरेश कोंडेकर, वासू धनगर, वैभव चेंडके, किरण चेंडके यांच्यासह धनगर समाजबांधव आणि भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *