Thursday , June 4 2026
Breaking News

“स्वामी समर्थ” मालिकेतील कलाकार बुधवारी बेळगावात

Spread the love

 

बेळगाव : स्वामी समर्थ पादुका आणि पालखी परिक्रमेचे उद्या सोमवारी बेळगाव शहरात आगमन होत आहे. सदर पादुका आणि पालखी परिक्रमा ७ दिवस बेळगावात विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहे. दरम्यान याच काळात कलर्स मराठी या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारही बेळगावच्या परिक्रमेत बुधवार दिनांक 21 रोजी सहभागी होणार आहेत.

सध्या कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या “स्वामी समर्थ” या मालिकेतील स्वामींची भूमिका करणारे कलाकार अक्षय मुडवाडकर आणि चोळापाची भूमिका करणारे नचिकेत जोग बुधवारी दुपारी खासबाग ओम नगर येथील खोबरे कुटुंबीयांच्या निवासस्थानाजवळ होणाऱ्या, पादुका-पालखी पूजन तसेच महाप्रसाद कार्यक्रमात सहभागी होतील.

सायंकाळी चार वाजता संत गाडगेबाबा भवन, शामाप्रसाद मुखर्जी रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अभिनेते अक्षय मुडवाडकर आणि अभिनेते नचिकेत जोग उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बेळगावचे महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते दोन्ही कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी अन्नछत्र मंडळाचे ट्रस्टी अभय खोबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचप्रसंगी बेळगावात ज्या ज्या ठिकाणी पालखी परिक्रमा होते त्या आयोजकांचा सत्कार अभिनेते अक्षय मुडवाडकर आणि अभिनेते नचिकेत जोग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वामी समर्थ आराधना केंद्राचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव सुनिल चौगुले, डॉक्टर अशोक खोबरे व सहकारी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *