Sunday , September 20 2026
Breaking News

युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने हाफ पिच (सर्कल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने 26 जानेवारी रोजी खानापूर तालुका मर्यादित हाफ पिच (सर्कल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला 7001 तर उपविजेत्या संघाला 4555 रुपयांचे बक्षीस आणि आकर्षक चषक दिला जाणार आहे. यासह उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीरसाठी आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, शिवोली येथील उद्योजक मुकुंद पाटील, हलशी लक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळू जाधव, मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील, सुनील पाटील गर्लगुंजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी माजी पिकेपीएस सदस्य अनंत देसाई असणार आहेत.
स्पर्धेचा तालुक्यातील संघानी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी शुभम देसाई (8499968262) किंवा राजन सुतार (8139901919) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *