Monday , September 21 2026
Breaking News

आर्थिक छळाला कंटाळून महिलेची डेथनोट लिहून आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : मायक्रो फायनान्स संस्थांच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील आनिगोळ गावात घडली आहे. मृत महिलेचे नाव गौरव्वा नीलप्पा केंगानूर (वय 36) असे आहे.
मृत गौरव्वा या महिलेने मायक्रो फायनान्सकडून ७-१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी कर्ज वसुलीसाठी तिला सतत त्रास देत होते. यामुळे नाराज झालेल्या महिलेने आपल्या घरातील भिंतीवर डेथनोट लिहून आत्महत्या केली.

भिंतीवर लिहिलेल्या डेथनोटमुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढवले ​​आहे. त्याने डेथनोटमध्ये तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची नावे नमूद केल्याचे कळते.

माझ्या मृत्युस संघाच्या सुमव्वा मंजव्वा आणि कस्तुरी या जबाबदार असून माझ्या मुलांची जबाबदारी आत्ता तुमची असून सिद्धप्पाने अरुदाला दहावी उत्तीर्ण करावे. ही माझी शेवटची इच्छा आहे. बहिणीची चांगली काळजी घे, असे गौरव्वाने घरातील भिंतीवर लिहिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *