Friday , April 17 2026
Breaking News

क्रेडाई बेल्कॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शनाची मुहूर्तमेढ

Spread the love

 

बेळगाव : क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंटस यांच्यावतीने बेल्कॉन 2026 बांधकाम, प्राॅपर्टी, बांधकाम साहित्य इंटिरियर्स, एक्स्टेरीअर, फर्निचर तसेच ऑटो एक्सपो प्रदर्शनाचे आयोजन 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान आज बुधवारी सकाळी सीपीएड मैदानावर सदर प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

यावेळी प्रथमच सदर प्रदर्शन अत्यंत आधुनिक आणि सुसज्जित अशा वातानुकूलित शामियान्यात संपन्न होणार आहे. कर्नाटक राज्यात बेंगलोर शहरानंतर बेळगावात अशा प्रकारचे भव्य रिऐलिटी, इंटिरियर्स आणि बांधकाम साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्राहकांना एकाच छताखाली आपल्या स्वप्नातील हक्काच्या घराच्या सर्व प्रकारच्या बांधकाम साहित्याची एकाच छताखाली माहिती मिळणार आहे‌. तब्बल एक लाख स्क्वेअर फुट जागेत बेल्कॉन आणि ऑटो एक्सपो प्रदर्शन संपन्न होत आहे. प्रदर्शनात बेल्कॉनच्या 150 स्टॉल्समध्ये बांधकाम क्षेत्रातील फ्लॅट, बंगला, विटा, वाळू, स्टील प्लायवूड, लाइटिंग, गृह सजावट, लिफ्ट यासारख्या सर्व प्रकारच्या आणि महत्त्वपूर्ण साहित्य सुविधांचे प्रदर्शन आणि माहिती बेळगावच्या ग्राहकांना मिळणार आहे. .

या प्रदर्शनात ऑटो एक्स्पोतील शंभर स्टॉल्सवर विविध नामवंत कंपन्यांच्या कार, टू व्हीलर, ई-व्हेईकल्स वाहने व वाहनांचे स्पेअर पार्ट, विंटेज कार, स्टंट ड्राइविंग आदींचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. आज पार पडलेल्या मुहुर्तमेढ कार्यक्रमाला

क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, महेश फगरे, ज्ञानेश्वर सायनेकर, सचिन बैलवाड, यश इव्हेंटचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर, विनय कदम, सचिन कळ्ळीमनी, तनिश कलळ्ळीमनी, राजेंद्र मुतगेकर, अभिषेक मुतगेकर, क्रेडाई ईव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर, दीपा वांडकर, अमर अकनोजी, सीमा हुलजी, सुधीर गड्डे, राजेश माळी, नारायण पवार, वीरेश शेट्टनवर, यश कलळ्ळीमनी, गोविंद टक्केकर, आनंद कुलकर्णी, पी एस हिरेमठ आदींसह अनेक सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *