Sunday , July 26 2026
Breaking News

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ

Spread the love

 

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी महिला मंडळ, वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे समादेवी गल्ली श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. श्री समादेवीच्या कृपेने सोमवार रोजी शुभमुहूर्तावर जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ अविनाश बिडीकर यांच्या शुभहस्ते रोवण्यात आली.

गुरुवार दि. २९ ते रविवार दि. १ होणाऱ्या श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सोमवारी रोजी मुहूर्तमेढ करून करण्यात आली. पौरोहित्याचे काम युवराज भट यांनी काम पाहिले. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, ट्रस्टी सुधीर मदली, राकेश कलघटगी, सुरेश पिळणकर, उपाध्यक्ष राहुल गावडे, खजिनदार राहुल कलघटगी, वैश्यवाणी युवा संघटना अध्यक्ष प्रवीण पिळणकर, मिलिंद नार्वेकर, चंदन मुरकुंबी, नंदू अंगडी, अमित गावडे, आनंद गावडे, विकास कलघटगी, कार्यकारणीतील सर्व सदस्य तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *