Friday , April 17 2026
Breaking News

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मराठा मंडळ फार्मासी कॉलेजच्या एनएसएसतर्फे अनाथालयास भेट

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून २४ जानेवारी रोजी, मराठा मंडळ फार्मासी काँलेजच्या एनएसएस युनिटच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एनएसएस युनिट व प्रथम वर्ष डी. फार्मा विद्यार्थ्यांनी सुभाषनगर, बेळगाव येथील गंगाम्मा चिक्कुंबी मठ या अनाथालयास भेट दिली.
हा कार्यक्रम सहाय्यक प्राध्यापिका तसेच कार्यक्रम प्रमुख प्रा. अंकिता कानशिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या भेटीमागील मुख्य उद्देश बालिकेचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, करुणा आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अनाथालयातील मुलींशी व तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, आनंदाचे क्षण वाटून घेतले आणि त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. प्रेम व प्रोत्साहनाच्या भावनेतून अनाथालयातील मुलींना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागातून अनाथालयाच्या कल्याण व विकासासाठी आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अर्थपूर्ण व प्रेरणादायी ठरला. या माध्यमातून त्यांच्यात सहवेदना, कृतज्ञता व सामाजिक बांधिलकीचे मूल्य रुजले असून राष्ट्रीय बालिका दिनाचा उत्सव समाजोपयोगी व सार्थक पद्धतीने साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कॉलेजच्या शिक्षकवर्गातून प्रा.हर्षदा कुसाणे, प्रा.आशा पाटील, प्रा. विश्वनाथ नाडगौडा, प्रा. सुमैया खोजा तसेच प्रथमवर्षं डी. फार्मासीचे विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शिवसेनेकडून सत्कार

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *