Friday , April 17 2026
Breaking News

जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनचा 9 वा वर्धापनदिन व हळदीकुंकू समारंभ संपन्न

Spread the love

 

बेळगाव : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित मण्णूर संचलित जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन, मण्णूर या संस्थेचा 9 वा वर्धापनदिन व हळदी कुंकू समारंभ अनन्य फार्म हाऊस येथे पार पडला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल के कालकुंद्री सर व चेअरमन लक्ष्मण मंडोळकर तसेच सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन बेळगावच्या माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर यांनी केले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या मूर्तीचे पूजन महिला संचालक मंडळ यांनी केले व तसेच दिपप्रज्वलन सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले, एल के कालकुंद्री सर यांनी प्रास्ताविक करताना सहकारी संस्था हि कुणाच्या मालकीची नसते ती जनतेची व सर्व सभासदांच्या मालकीची असते, विश्वास हाच सहकारी संस्थांचा कणा आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य आम्ही राबवित आहोत असे त्यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमाचा उद्धेश व संस्थेच्या कार्याचा आढावा व्यवस्थापक महेश काकतकर यांनी सांगितला. या नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. रेणू किल्लेकर यांनी महिलांना उद्धेशून स्वतंत्र महिला उद्योग सुरु करावेत असे आपले विचार मांडले. या नंतर प्रमुख वक्ते श्री. अनिल चौधरी सर यांनी आपले विचार व्यक्त केले व महिलांनी आपल्या जीवनात अडचणींना सामोरे कसे जावे व आपल्या मुलांना स्वावलंबी व मुलांवर काय संस्कार द्यावे हे पटवून सांगितले तसेच अल्पावधीतच ही संस्था प्रगतीपथावर पोहोचली आहे तसेच जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले होते, या स्पर्धांचे बक्षिस वितरण यावेळी करण्यात आले तसेच अग्नीवीरमध्ये भरती झालेल्या मुले व मुलीचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला व गावातील पदवीधर मुलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, जोतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, एम बी सांबरेकर, रामा चौगुले, तानाजी तरळे, आनंद बाळेकुंद्री, शीतल चौगुले, लता कडोलकर, तसेच संस्थेचे कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर, पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर तसेच अ वर्ग सभासद व हितचिंतक आदी उपस्थित होते. नावगेकर टीचर यांनी सूत्रसंचालन केले व व्यवस्थापक महेश काकतकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *