Monday , April 20 2026
Breaking News

वडगाव परिसरात प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा सुरू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात 24/7 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 24 तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मतदार संघातील वडगाव परिसरात गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने या भागातील पाणीपुरवठा योजनेला चालना देण्यात येणार आहे. यासंदर्भात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुविधा घेतलेल्या नागरिकांना पत्र पाठवून विशेष आवाहन केले आहे. बेळगाव शहरातील दक्षिण विभागात जवळपास 50 हजाराहून अधिक घरांनी 24 तास पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी करून घेतली आहे. 12 फेब्रुवारी 2026 पासून सदर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून पुढील तीन ते चार महिन्यापर्यंत दिवसातून दोन ते चार तास प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यानंतर सदर योजना नियमितपणे सुरू करून शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यात येईल त्यापूर्वीच महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी असलेल्यांना नव्याने नळ जोडण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचे देखील आमदार अभय पाटील यांनी पत्राद्वारे नागरिकांना कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *