Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील व डॉ. नागभूषण चौगुले हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. चौगुले यांनी डोळ्यांचे विकार व विविध समस्या सांगून ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले व उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
यावेळी अश्विनी पाटील यांनी प्रार्थना सादर केली. तर रविंद्रनाथ जुवळी, प्रकाश कुडतरकर, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, आर. जी. कुंभोजकर, उल्हास पानसे, डॉ. श्रेयस चौगुले, योगिनी देसाई यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी सादर केली.
यावेळी माजी कार्यकारिणी सदस्य मोहन सप्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर आभार के. एल. मजूकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *