Friday , April 17 2026
Breaking News

सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे सन 2025-26 सालातील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ.दिव्या संदिप कुंडेकर या होत्या, प्रमुख वक्त्या शाळेच्या माजी विद्यार्थीनी आणि निर्देशक, कौशल्य अभिवृद्धी केंद्र आणि अध्यक्षा महिला घटक व्हीटीयू डॉ. संध्या राजन अणवेकर त्याचबरोबर बेळगाव ग्रामीणचे क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय आर.के., सी.आर.पी. येळ्ळूर केंद्रप्रमुख श्री. महेश जळगेकर, प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर वाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम बी पाटील म्हणून उपस्थित होते आणि एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष, सदस्य व सदस्या उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे शाळेच्या विद्यार्थींनी ईशस्तवन, स्वागतगीताने स्वागत केले तसेच सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने भगवा फेटा बांधून, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यांनतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्तीचे पुजन एस.डी.एम.सी.सदस्य श्री. मारुती कृष्णा यळगुकर यांनी केले, सरस्वती देवी फोटो पूजन एस.डी.एम.सी. सदस्या सौ.प्रियांका राणोजी सांबरेकर व मयुरी महेश कुगजी यांनी केले, राजमाता जिजाऊसाहेब फोटो पूजन एस.डी.एम.सी. सदस्या सौ.रेश्मा पुंडलिक काकतकर व सौ.अलका सुनील कुंडेकर यांनी केले, महात्मा जोतिबाराव फुले फोटो पूजन एस.डी.एम.सी. सदस्य श्री. मुर्तीकुमार श्रीराम माने व श्री जोतिबा शांताराम पाटील यांनी केले, सावित्रीबाई फुले फोटो पूजन एस डी एम सी सदस्या सौ.राजेश्री बसवराज सुतार व श्रीमती शुभांगी सुनील मुतगेकर यांनी केले तसेच दिपप्रज्वलन एस.डी.एम.सी. सदस्य श्री. दिनेश अशोक लोहार, श्री. शशिकांत चांगदेव पाटील, श्री. विजय चांगाप्पा धामणेकर, सदस्या सौ. अर्चना प्रविण देसाई, सौ.ज्योति जोतिबा पाटील यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले. यानंतर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेन्द्र चलवादी यांनी प्रास्ताविक केले त्याचबरोबर क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय आर.के. यांनी शाळेचे गुणगौरव करत शाळेला मिळालेला कर्नाटका पब्लिक स्कूलचा दर्जा याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इतर व्यसनांपासून आम्ही कसे दूर राहावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सी.आर.पी. महेश जळकेकर यांनी स्वरचित ‘संमेलनाला जाण्यासाठी एका चिमुकल्याची आईला दिलेली हाक’ स्वरचित कवितेतून सादर केली. त्यानंतर डॉ. संध्या यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी तसेच या शाळेकडून झालेले त्यांच्यावरील संस्कार यावर भाष्य करत आपल्या स्मृतीना उजाळा दिला तसेच 2023- 24 सालातील नम्रता लक्ष्मण कुंडेकर, साधना सुनील देसाई, करुणा मजुकर आणि 2024-25 सालातील ऐश्वर्या जोतिबा मानकोजी, अपूर्वा लक्ष्मण पाटील आणि तनुजा हट्टीकर, सिद्धी जाधव या विद्यार्थिनींचा 10 वी मध्ये येळ्ळूर केंद्रामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या शाळेच्या विद्यार्थिनींचा सत्कार माननीय क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय आर. के. आणि प्रमुख वक्त्या संध्या राजन अणवेकर यांच्याकडून करण्यात आला. त्याचबरोबर 2024-25 सालातील इयत्ता सातवी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या अनुक्रमे समीक्षा सिद्धाप्पा पाटील, जिग्नेश रवींद्र गुरव व श्रेया सुरेश काकतकर या विद्यार्थ्यांचा कै. गंगुबाई लुमाण्णा यळगुकर यांच्या स्मरणार्थ श्री मारुती कृष्णा यळगुकर यांच्याकडून बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. भाग्यवान पालक या उपक्रमासाठी कै. सुद्धा श्रीराम माने यांच्या स्मरणार्थ श्री मूर्तीकुमार श्रीराम माने यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देऊन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे एसडीएमसी उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर तसेच मुख्याध्यापक श्री. आर. एम. चलवादी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण झाले उद्धाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. एस. मंडोळकर, स्वागत व सत्कार श्री एस बी पाखरे, आभार श्रीमती एम एम देसाई आणि स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक नृत्य विद्यार्थ्यांनी जवळपास 28 विविध विषयांवर नृत्य, नाटक सादर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस एस. बाळेकुंद्री आणि श्रीमती ए. वाय. मेणसे कार्यक्रमाच्या शेवटी लॉटरी पद्धतीने भाग्यवान पालक श्री. उमेश पाटील हे ठरले. यावेळी संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शिवसेनेकडून सत्कार

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *