Sunday , July 26 2026
Breaking News

मातोश्री ट्रॉफी ग्रामपंचायत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : मातोश्री क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन, मण्णूर, यांच्या वतीने खास महाशिवरात्री निमित्त मण्णूर -आंबेवाडी -गोजगे अश्या तिन्ही गावाच्या मिळून मातोश्री ट्रॉफी नावाने ग्रामपंचायत प्रीमियर लीग हि क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचा उदघाटन सोहळा मण्णूर येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर अतिउत्साहात पार पडला. सर्व प्रथम मण्णूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन झाले. गावातील जेष्ट नागरिक शिवाजी रानबा कालकुंद्री व देवाप्पा रुक्मांना शहापूरकर यांच्या हस्ते महाराजांचे पूजन झाले. यानंतर मधुकर भैरू चौगुले यांनी ध्वज पूजन तर महादेव शंकर डोनकरी यांनी मशाल पूजन केले. क्रिकेट रॅलीचे उदघाटन लक्ष्मण शंकर चौगले, किरण चौगुले, भैरू पुंडलिक चौगुले, भरमा आनंदाचे या मान्यवरांच्या हस्ते झाले. वाजत गाजत मशाल व ध्वज कार्यक्रम ठिकाणी आणण्यात आला. श्री. देवाप्पा म्हात्रु चौगुले आणि स्टेज पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. द्वीपप्रज्वलन श्री मुकुंद भावकु तरळे, लक्ष्मण कल्लाप्पा कालकुंद्री, भाऊराव सांबरेकर, सुरज मंडोळकर, सागर कटगेन्नावर व इतर, श्री गणेश फोटो व जिजामाता फोटो पुजन ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मी यळगूकर, सौ. लक्ष्मी शंकर सांबरेकर, सौ. अन्नपूर्णा भरत चौगुले यांच्या हस्ते झाले.

चषक पूजन सोमनाथ कांबळे व विनायक कल्लाप्पा चौगले, महेंद्र चौगुले, शामसुंदर मालाई यांनी केले. नावाने सुरुवात केलेल्या मातोश्री फौंडेशनच्या बॅनरचे अनावरण फौंडेशनचे अध्यक्ष अनिल कृष्णा काकतकर व सर्व टीम मालक यांनी केले. सर्व खेळाडूसाठी जर्सी ही मातोश्री सौहार्द सोसायटी यांच्या वतीने देण्यात आली. त्या जर्सीचे अनावरण सोसायटीच्या सर्व संचालक व सल्लागार यांनी केले. ग्राउंड पूजन श्री. युवराज कृष्णा काकतकर तर यष्टी पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांनी केले. क्रिकेट सामन्याचे उदघाटन विठू माउली कंस्ट्रक्शनचे मालक श्री. शंकर सांबरेकर व मातोश्री सौहार्द सोसायटीचे चेअरमन श्री. आर एम. चौगुले यांनी केले.

एशिअन गेम्स 2026 चेन्नई या ठिकाणी पोहणे प्रकारात दोन गोल्ड मेडल पटकाविलेल्या मयंक नागेश हालदार व याचे आईवडील व प्रशिक्षक शामसुंदर मालाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खेळाडूंसाठी व पाहुण्यांसाठी अल्पोपहारची व्यवस्था व्हॉइस चेअरमन श्री. सागर कटगेन्नावर तसेच खेळाडूंसाठी मेडिकल किटची व्यवस्था डॉ. भरत चौगुले यांनी दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर. एम. चौगुले व स्वागताध्यक्ष
अनिल काकतकर हे होते. श्री. टी. के. मंडोळकर, श्री. एन. के. कालकुंद्री, श्री.भरमा मा.चौगुले, श्री.सतीश बोगाळे,श्री.नागेश चौगुले, श्री.राहुल मंडोळकर, श्री.सुनील काकतकर, गौतम नाईक, विजय मंडोळकर, अभिषेक काकतकर, सुनील सुधाकर चौगुले, धर्मराज काटग्यान्नावर, उमेश शिंदे, मधू कडोलकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप डोनकरी व डॉ.भरत चौगुले यांनी केले. आभार प्रदर्शन मातोश्रीचे संचालक श्री. शंकर अप्पुगोल यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *