Sunday , July 26 2026
Breaking News

गर्भवती पत्नीवर चाकूने वार करून पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे गर्भवती पत्नीवर चाकूने वार करून स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामदुर्ग येथील रहिवासी उमेश बेडीगेर (३४) असे मृत व्यक्तीचे नाव असून उमेश याला दारूचे व्यसन होते. उमेश हा दारूच्या नशेत असताना क्षुल्लक कारणावरून त्याच्या पत्नीशी भांडण झाले. दुसऱ्या दिवशी देखील हे भांडण असेच सुरू होते. पती-पत्नी मधील वाद वाढला आणि पती उमेश याने पत्नीवर चाकूने वार केले त्यानंतर त्याने स्वतः देखील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गर्भवती पत्नीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पत्नीची प्रकृती सध्या स्थिर आहे. उमेशचा मृतदेह अग्निशामक दलाच्या मदतीने विहिरीबाहेर काढण्यात आला असून रामदुर्ग पोलीस पुढील तपास करीत आहेत. सदर घटनेची नोंद रामदुर्ग पोलीस स्थानकात करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *