Wednesday , May 29 2024
Breaking News

चिकोडी

चिक्कोडी परिसरात विज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी परिसरात गुरुवारी रात्री विज कोसळून दोन शेतकरी व 12 मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात वीज पडून गुरु पुंडलिक (३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले. जखमींवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकेश्वर शहराच्या हद्दीत वीज पडून 12 मेंढ्यांचा …

Read More »

कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने पत्नी- मुलाला ठेवले नजरकैदेत; कंटाळलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

  हुक्केरी : कर्जफेडीला दिरंगाई केल्याने महिलेने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गावातील सिद्धव्वा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी ५ …

Read More »

नुकसानग्रस्तांना भरपाई देणार : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  निपाणी परिसरात नुकसानीची पाहणी निपाणी (वार्ता) : वादळी वारे व पावसामुळे निपाणी तालुक्यात अनेक घरे, गॅरेज, दुकान, मालमत्तेसह झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून पंचनाम्यासह तात्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. तसा आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब …

Read More »

सदलगा शहरातील हजरत ख्वाजा शमनामीर दर्गा येथे मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा या शहरी सेवासदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिक्कोडी, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम युवा समाज सेवा संघ सदलगा आणि हजरत ख्वाजा शमनामीर दर्गा कमिटी सदलगा यांच्या संयुक्त आश्रयाखाली मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आज शिबिराचे मुख्य डॉक्टर श्री अब्रार अहमद पटेल, चिक्कोडी …

Read More »

बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.38 टक्के तर चिक्कोडीत 78.51 टक्के मतदान

  बेळगाव : लोकशाहीचा सण असलेली निवडणूक शांततेत पार पडली असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघ 71.38 टक्के तसेच बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. एकूण गतवेळच्या तुलनेत …

Read More »

बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास …

Read More »

प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य मिळेल

  जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा विश्वास निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.चिकोडी लोकसभा मतदारसंघात ५ लाख ६८ हजार महिलांना ९ महिन्यांपासून दर महिन्याला २००० रुपये दिले जात आहेत. १ लाख ५० हजार कुटुंबांचे वीज बिल माफ झाले आहे. ७ लाखांवर कुटुंबांना मोफत …

Read More »

शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा : बाबासाहेब खांबे यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणेच सीमा भागामध्ये निपाणी शिवसेना सीमाप्रश्नाची बांधीलकी जपत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी यांना बिनशर्त पाठींबा देत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी दिली. खांबे म्हणाले, शिवसेना वरिष्ठांच्या आदेशानुसार निपाणी शिवसेना काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देत आहे. निपाणी सीमाभागामध्ये …

Read More »

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे रिटर्निंग ऑफिसर राहुल शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा ग्रा.पं. सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी (१ मे) पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक-2024 संदर्भात चिक्कोडी …

Read More »

चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी उद्योजक रोहन साळवे यांची निवड

  निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडीतील साळवे परिवार अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे. या कामाचा विचार करून युवा उद्योजक रोहन साळवे यांची चिक्कोडी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी साळवे यांना दिले. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली …

Read More »