Tuesday , August 25 2026
Breaking News

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाच्या (बुडा) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्रीपदाच्या चर्चेत असलेल्या सेठ यांच्यावर सरकारने आता महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

बुडाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या जागी आसिफ सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या सचिव लता के. यांनी मंगळवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

बेळगाव शहराच्या नियोजनासह विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी आता आमदार आसिफ सेठ यांच्याकडे आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार सेठ यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पांना चालना मिळते का, याकडे आता बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

साखर साठेबाजीला लगाम; ४ हजार क्विंटलची कमाल मर्यादा

Spread the love  दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा दणका; ३० दिवसांपेक्षा अधिक साठा केल्यास कारवाई बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *