Tuesday , August 25 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देत शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट दिली.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, वृक्षसंवर्धन, कृषीविषयक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे सुपूर्द करून त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी “आजचे रोप म्हणजे उद्याची सावली, फळे आणि समृद्धी” हा प्रेरणादायी संदेश दिला. वृक्षसंवर्धनासोबतच शेतकऱ्यांच्या भविष्यातील समृद्धीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

साखर साठेबाजीला लगाम; ४ हजार क्विंटलची कमाल मर्यादा

Spread the love  दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा दणका; ३० दिवसांपेक्षा अधिक साठा केल्यास कारवाई बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *