
बेळगाव : भगवान बलराम यांचा प्राकट्य दिवस हा इस्कॉन चळवळीमध्ये बलराम जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस शुक्रवार दि. 28 रोजी साजरा होत असून त्यानिमित इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर, शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अभिषेक, सात वाजता परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन आणि रात्री साडेआठ नंतर महाआरती व सर्वांसाठी प्रसाद आयोजित केला आहे. भक्तांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta