
येळ्ळूर : जीवनात मन आणि मनगट घट्ट असेल तर ती व्यक्ती यशस्वी होते त्यासाठी विद्यार्थी दशेतच आपले मन व मनगट मजबूत बनवा, क्रीडा हा उपजत गुण आपला स्वभाव धर्म आहे त्याचा विकास करावा त्यासाठी क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे उद्गार श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले.
येळ्ळूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या मैदानात पार पाडले. येळ्ळूर झोनल स्पर्धेमध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर, महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर, भावकेश्वरी विद्यालय सुळगे, नेताजी हायस्कूल सुळगे, देसूर हायस्कूल देसूर, सी एस सी टी एस हायस्कूल देसूर, माध्यमिक विद्यालय धामणे, माध्यमिक विद्यालय नंदीहळ्ळी तसेच गव्हर्नमेंट हायस्कूल मार्कंडेय नगर या शाळांचा समावेश आहे. सुरुवातीला सचिव प्रसाद मजूकर यांनी ध्वजारोहण केले. तसेच दीप प्रज्वलन कॉन्ट्रॅक्टर श्री. विलास पांडुरंग पाटील (अवचारहट्टी), गणेबेल हायस्कूलचे मुख्याध्यापक हायस्कूल श्री. आर. बी. पाटील, ज्ञानेश्वर विद्यालय, लोकोळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एम. येळ्ळूरकर, मणतूर्गा हायस्कूल मणतूर्गा शाळेचे मुख्याध्यापक जे. एम. पाटील, कारलगा हायस्कूल कारलगा शाळेचे मुख्याध्यापक ए. एम. पाटील यांच्या हस्ते झाले.
क्रीडा ज्योतीचे स्वागत कॉन्ट्रॅक्टर मारुती पवार (राजहंसगड), क्रीडा साहित्य पूजन श्री. मनोहर पुनगौडा पाटील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर व क्रीडांगण पूजन श्री. बाळकृष्ण शिवाजी कंग्राळकर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्या हस्ते झाले.
ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी प्रतिमेचे पूजन श्री. चंद्रकांत दादा पाटील (संचालक) यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्यानचंद प्रतिमेचे पूजन प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र मजुकर सर यांनी केले तसेच सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेचा गुणवंत विद्यार्थी मनीष पवार याचा गुरुवर्य श्री. वाय. एन. मजुकर फाउंडेशनच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला मनीषने अल्पावधीतच आपल्या पखवाझ वादनाने हजारो श्रोत्यांना मंत्रमुक्त करत गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात अनेक दिग्गज कीर्तनकार व प्रवचनकारांना पखवाज साथ दिली आहे.
यावेळी प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक जे. एम्. पाटील तसेच शाळेचे जेष्ठ निवृत्त क्रीडाशिक्षक मधु पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वाय. एन. मजुकर फाउंडेशन मार्फत येळ्ळूर झोनल मधील सर्व क्रीडा शिक्षक व शाळेच्या शिक्षक वर्गाला जर्सीचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाय. बी. कंग्राळकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम. एम. डोंबले, ए. बी. कांबळे, वाय. बी. कंग्राळकर, एल. एस. बांडगे, टी. एस. बोकडेकर, श्रीमती व्ही. पी. जीवाई आणि प्रायमरी शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग यांच्यासह शालेय मंत्रिमंडळाने परिश्रम घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta