Tuesday , August 25 2026
Breaking News

ईद-ए-मिलादनिमित्त बेळगावात वाहतूक मार्गात मोठे बदल; २६ ऑगस्टला सकाळी ८ पासून निर्बंध

Spread the love

बेळगाव : ईद-ए-मिलाद सणानिमित्त २६ ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हे वाहतूक निर्बंध मिरवणूक संपेपर्यंत लागू राहतील.

मिरवणुकीला पिंपळ कट्टा येथून सुरुवात होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, सेंट्रल बस स्टँड, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळी रायण्णा सर्कल, डी.सी. ऑफिस गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, एन.डी. खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी सर्कल, फिश मार्केट आणि ग्लोब सर्कल मार्गे असद खान दर्गा येथे सांगता होणार आहे.

सकाळी ८ पासून वाहतूक वळविणार

२६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत या मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात येणार आहे.

खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अशोक स्तंभ, लेकव्ह्यू हॉस्पिटल, कनकदास सर्कल, कॅन्सर हॉस्पिटल, KLE छत्री, हिंदाल्को अंडरब्रिज, बॉक्झाईट रोड, हनुमाननगर डबल रोड, हिंदळगा गणेश मंदिर, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शारकत पार्क, MLIRC कॅन्टीन क्रॉस आणि मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस या मार्गाचा वापर करावा.

गोगटे सर्कल रेल्वे फ्लायओव्हरकडून शहरात येणाऱ्या वाहनांनी गोगटे सर्कलवरून डावीकडे काँग्रेस रोडने जाऊन मिलिटरी महादेव मंदिराजवळ उजवीकडे वळावे. त्यानंतर MLIRC कॅन्टीन क्रॉस मार्गे पुढे जाता येईल.

खानापूरहून काँग्रेस रोडमार्गे शहरात येणाऱ्या वाहनांनी मिलिटरी महादेव मंदिराजवळ डावीकडे वळून MLIRC कॅन्टीन क्रॉस, शारकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शौर्य चौक, गांधी सर्कल, हिंदळगा गणेश मंदिर, हनुमाननगर डबल रोड आणि बॉक्झाईट रोडमार्गे पुढे जावे.

गोगटे सर्कलहून रेल्वे स्टेशन, स्टेशन रोड आणि हेड पोस्ट ऑफिस सर्कलमार्गे शनी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी गोवा वेस सर्कल, महात्मा फुले रोड, बँक ऑफ इंडिया सर्कल, भटकांडे स्कूल क्रॉस आणि जुना पी. बी. रोडचा वापर करावा.

नाथ पै सर्कलहून शनी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी भटकांडे स्कूल क्रॉस, जुना पी. बी. रोड किंवा खासबाग बसवेश्वर सर्कल आणि संभाजी गल्ली रोडचा पर्यायी मार्ग वापरावा.

जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक/कांबळी खूट, पिंपळ कट्टा आणि पाटील गल्लीकडून येणारी वाहतूक VRL Logistics, भटकांडे स्कूल क्रॉस, बँक ऑफ इंडिया सर्कल, महात्मा फुले रोड आणि गोवा वेस सर्कलमार्गे वळविण्यात येणार आहे.

अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी

२६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व दिशांनी शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश आणि वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे.

मिरवणूक मार्गावर पार्किंगला मनाई

मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गाच्या दोन्ही बाजूंना कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पिंपळ कट्टा ते असद खान दर्गा या मिरवणूक मार्गावर हा नियम लागू राहणार आहे.

पर्यायी पार्किंगची व्यवस्था

वाहनधारकांसाठी पुढील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे –

* जिजामाता सर्कलजवळ भारतेश एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोरील कॅन्टोन्मेंट पार्किंग

* सरदार ग्राउंड

* महिला पोलीस ठाण्यामागील मोकळी जागा

* टिळकवाडीतील झटपट कॉलनीजवळील मोकळी जागा

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

रेशन सर्व्हरच्या समस्येने दुकानदार, लाभार्थी त्रस्त; वितरण व्यवस्था ठप्प

Spread the love  बेळगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *