धारवाड : विद्याकाशी म्हणून ओळखलं जाणारं धारवाड शहर गुरुवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं चांगलंच हादरलं आहे. धारवाडमध्ये काल रात्री उशिरा रिअल इस्टेट व्यावसायिकासह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. महमद कुडची नावाच्या रिअल इस्टेट व्यावसायिकाची चाकूने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना धारवाडमधील कमलापूरच्या शिवारात घडली. महमद घरासमोर बसला …
Read More »मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : 1 जुन रोजी होणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गर्लगुंजी येथील येथील अरुण मष्णू पाटील (वय 63) हे 1 जून रोजी होणाऱ्या आपल्या …
Read More »सिमेंटच्या पाईप डोक्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू
सौंदलगा येथील घटना : जगण्याची झुंज ठरली अपयशी निपाणी (वार्ता) : डोक्यावर सिमेंट पाईप पडल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना माळ भाग सौंदलगा येथे घडली. तीन दिवस जगण्यासाठी केलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उत्तम शिवाजी …
Read More »लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची लॉटरी; शनिवारी होणार शपथविधी
बेंगळुरू : काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून आज 20 जणांची यादी निश्चित होण्याची शक्यता आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांच्यासह 20 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी (२७ मे) रोजी सकाळी ११.४५ वाजता शपथविधी होणार आहे. यामध्ये लक्ष्मी …
Read More »नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा नियती फाऊंडेशनच्यावतीने सत्कार
खानापूर : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा आज खानापूर नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच खानापूर भाजपच्या महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने मोठा विजय संपादन केला आहे. या यशाबरोबरच जबाबदारी देखील मोठी …
Read More »खानापूरात कृषी खात्याच्या सवलतीच्या दरातील बी बियाणाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते वाटप
खानापूर : खानापूर तालुक्यात सध्या पेरणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील बी बियाणाच्या वाटपाच्या प्रतिक्षेत गेल्या कित्येक दिवसापासुन होते. यंदाच्या कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणाऱ्या बी बियाणाचे वाटप नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते गुरूवारी दि. २५ रोजी जांबोटी क्राॅसवरील तालुका कृषी …
Read More »खानापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी संपुष्टात
लवकरच नविन पदाधिकारी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी येत्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नगरसेवकातुन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासाठी कोणते आरक्षण येणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. येत्या दोन वर्षे सहा महिन्यासाठी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी राहणार आहे. मागील दोन वर्षे …
Read More »पर्यावरणाच्या समतोलासाठी प्लास्टिकचा वापर हानिकारक
पर्यावरण अधिकारी रमेश; निपाणीत प्रबोधनपर नाटिका निपाणी (वार्ता) : गेल्या दशकापासून सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही अनेक जण प्लास्टिक कॅरीबॅगसह इतर प्लास्टिकच्या वस्तू वापरून त्या फेकून देत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे …
Read More »खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : उत्तम पाटील
बोरगाव प्रीमियर लीगचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास येत आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसताना ग्रामीण भागात होतकरू खेळाडू पहावयास मिळत आहेत. अशा खेळाडूंना शासनाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या अंगी असलेले विविध गुण आपण ओळखून अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक …
Read More »यू. टी. खादर यांची सभापतीपदी निवड
बेंगळुरू: माजी मंत्री आमदार यू. टी. खादर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून आमदार यू. टी. खादर यांची बिनविरोध निवड झाली असून आर. व्ही. देशपांडे यांनी खादर त्यांच्याकडे पदभार सोपवला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नूतन अध्यक्ष यू. टी. खादर यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta