Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर खड्डेच खड्डे

  खानापूर : शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडत आहेत. नांगनुर बस स्टॉपसमोर धोकादायक भली मोठी चर पडली असून तिथं वारंवार अपघात घडत आहेत. तसेच बुगटे …

Read More »

रुग्णवाहिकेसह 3 वाहनांचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

  दावणगेरे : दावणगेरे येथे रुग्णवाहिकेसह तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते. ट्रॅक्टर, दुचाकी आणि रुग्णवाहिका एकमेकांना धडकली असता हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी जोरात होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Read More »

बोरगावमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच

कोल्ड स्टोरेज येथे चोरीचा प्रयत्न फसला : नागरिक भीतीच्या छायेखाली निपाणी (वार्ता) : बोरगाव- इचलकरंजी रस्त्यालगत असलेल्या रोहिले कोल्ड स्टोरेज या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांनी पलायन केले. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी चोरीचा प्रयत्न होणारी महिन्यातील ही तिसरी घटना असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे …

Read More »

चोरांपासून सावधान, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपनिरीक्षक एस. भरतगौडा

बोरगाव येथे सार्वजनिक ठिकाणी जनजागृती निपाणी (वार्ता) : सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सध्या ग्रामीण भागात चोरींचे प्रकार वाढत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही चोरीच्या घटना वाढत आहेत. अशा चोरी व चोरांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगून सतर्क रहावे. याशिवाय लहान मुले पळविण्याच्या अफवा बसविल्या जात आहेत त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. असे काही …

Read More »

धर्मांतर बंदी विधेयक अखेर मंजूर

  सरकार – विरोधकात खडाजंगीनंतर विधान परिषदेची मंजूरी बंगळूर : विरोधी पक्ष काँग्रेस आणि धजदच्या आक्षेपांदरम्यान कर्नाटक विधान परिषदेने गुरुवारी वादग्रस्त “धर्मांतर बंदी विधेयक” मंजूर केले. विधानसभेने ते या आधीच मंजूर केले होते. याबरोबर सरकारने जारी केलेला धर्मांतर बंदी अध्यादेश मागे घेतला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ‘कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ राईट टू …

Read More »

वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दची लवकरच शाखा : मलगौडा पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : वीरराणी कित्तूर चन्नम्मा अर्बन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था लवकरच शाखेचा शुभारंभ करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मलगौडा ऊर्फ बसनगौडा पाटील यांनी सांगितले. ते वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत गाणकोकिळा लता मंगेशकर, मंत्री उमेश कत्ती, डी.एन. कुलकर्णी, नगरसेवक …

Read More »

अंकले ग्रामपंचायत अध्यक्षपदी भरत फुंडे बिनविरोध..

संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी भरत फुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळगांव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज अंकले ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरत फुंडे निवडले गेले आहेत. नूतन अध्यक्षांंवर गुलालाची उधळण …

Read More »

अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या महिलेला नुकसान भरपाई मिळवून द्यावी

  खानापूर : अतिवृष्टीमुळे सन्नहोसुर ता. खानापूर येथील रेणुका तातोबा पाटील यांचे राहते घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण अद्याप या महिलेला कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. तरी स्थानिक आमदारांनी सदर महिलेला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. तोपीनकट्टी ग्रामपंचायत हद्दीतील सन्नहोसूर येथील रेणुका …

Read More »

डॉ. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभियंत्यांनी काम करावे

  युवा नेते उत्तम पाटील : निपाणीत अभियंता दिन साजरा निपाणी (वार्ता) : देशाच्या जडणघडणीमध्ये डॉ. एम विश्वेश्वरय्या यांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. कोणताही उद्योग आणि व्यवसायात मनापासून कार्य करत असतानाही अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी केंद्र व राज्याचे धोरण एकत्र आणणे साध्य होत …

Read More »

खानापूरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  खानापूर (प्रतिनिधी) : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरवडा दिन पाळण्यात येणार असून या पंधरा दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाचे निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणी आडवा पाणी जिरवा, रक्तदान, झाडे लावा झाडे जगवा आदी कार्यक्रम …

Read More »