सौंदलगा : ग्रामपंचायतीकडून राबवल्या जाणाऱ्या जलनिर्मल योजनेच्या ठिकाणी सर्व साधारण दोन ते अडीच लाखांच्या साहित्याची चोरी. सौंदलगा ग्रामपंचायतीचे जलनिर्मल योजना राष्ट्रीय महामार्गाला लागून असुन त्यामध्ये असणाऱ्या साहित्याची चोरी करण्यात आली. यामध्ये पाण्याच्या साडेबारा एचपीचे एक मोटर, दहा एचपीचे दोन मोटर, याशिवाय कंपाउंडसाठी लागणाऱ्या तारेचे दोन बंडल, लोखंडी व्हॉल १३ नग, …
Read More »रयत संघटना कोणत्याही सत्तेला, आमिषाला बळी पडणार नाही
राजू पोवार : सुळगाव येथे रयत संघटना शाखा उद्घाटन कोगनोळी : सध्या राजकीय स्वार्थासाठी विविध पक्ष घरा-घरांमध्ये, धर्मा-धर्मामध्ये, जाती-जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा प्रकार रयत संघटना खपवून घेणार नाही. रयत संघटनेचे सर्व मावळे कोणत्याही सत्तेला किंवा आमिषाला कधीही बळी पडणार नाही. कारण आमच्यामध्ये नैतिकता …
Read More »उद्यापासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात
बेळगाव ‘ कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यांनी पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीत. सदर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा होणार आहेत. सदर होणार्या या परीक्षेवर देखील हिजाबवर बंदी देखील कायम ठेवण्यात आली आहे …
Read More »संकेश्वरात आज भगवान श्री पार्श्वनाथ मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील पार्श्वलब्दीपूरम येथील नूतन सांख्येश्वर पार्श्वनाथ मंदिरावर गुरुवार दि. २१ रोजी सकाळी ९.३० वाजता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. पार्श्वलब्दी शासनसेवा ट्रस्टच्यावतीने आज भगवान श्री पार्श्वनाथ मंदिर ते पर्वतराव पेट्रोल पंप दरम्यान सवाद्यसमवेत शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये गजराज अश्व हे लोकांचे खास आकर्षण ठरले. शोभायात्रेत आचार्य …
Read More »आम्ही जातो बदलीवर आमचा रामराम घ्यावा…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची लवकरच अन्यत्र बदली होणार असल्याची चर्चा नगरसेवकांतून केली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून ईटी संकेश्वर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावित आहेत. पालिकेत मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभर त्यांची कामगिरी चांगली ठरली. तदनंतर त्यांचा मनमानी कारभार सुरू झाला तो अद्याप चालूच …
Read More »बेंगलोर ते काशी रेल्वेसेवा लवकरच सुरू होणार
बेळगाव : कर्नाटकातून अनेक भक्त काशीला देव दर्शनासाठी जात असतात त्यामुळे भक्तांना सोयीस्कर व्हावे याकरिता बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवीन रेल्वेसेवा सुरू होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. कर्नाटकातून निघणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारकडून पाच …
Read More »खानापूरात सकल योजनाची वर्षपूर्ती फेरी
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी योजनेच्या सकल योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खानापूर तहसील कार्यालयाच्यावतीने बुधवारी दि. २० रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारातून सकल योजनेची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांच्याहस्ते सकल योजनेच्या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयापासून फेरीची सुरूवात झाली. शिवस्मारकातून बाजार …
Read More »चौथ्या लाटेची भीती; सरकारकडून खबरदारी : आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर
बेंगळुर : दिल्ली आणि इतर राज्यांत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्व प्रकारची खबरदारी सरकारने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बुधवारी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, दिल्लीसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर …
Read More »खानापूर शहराजवळील महामार्गाची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-पणजी महामार्गावरील शहरापासून जवळील मलप्रभा नदीच्या नविन पुलापासून ते गोवा क्रॉसपर्यंतच्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. याकडे संबंधित खात्याचे व तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षी लायन्स क्लब व करंबळ गावच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुडविले होते. …
Read More »सर्वोत्तम मधाळेंची ’सर्वोत्तम’ पेन्सिल आर्ट!
आतापर्यंत रेखाटलेली 60 चित्रे : 5 वर्षापासून जोपासलेला छंद निपाणी (विनायक पाटील) : प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. त्यातूनच आपली कला सर्वासमोर आणण्यासाठी धडपडत असतात. त्यातून काहीजण अर्थार्जन करून आपला उदरनिर्वाह करतात. पण आडी येथील निवृत्त मुख्याध्यापक सर्वोत्तम मधाळे यांनी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta