Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

आरटीपीसीआर सक्ती मागे घेण्याची बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बेळगाव (वार्ता) : व्यापार आणि उद्योग धंद्यांचे नुकसान होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्यामुळे परराज्यातील प्रवाशांना बेळगावातील प्रवेशासाठी करण्यात आलेली आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव ट्रेडर्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील फोरमच्या शिष्टमंडळाने …

Read More »

दहा रुपयांच्या नाण्याबाबत जनजागृती करा

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : भारतीय रिझर्व बँकेने दहा रुपयांचे नाणे हे अधिकृत चलन म्हणून 2016 साली घोषित केले. मात्र याचा वापर बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांनी अद्यापही केला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे कोठेच चलनात नसल्याचे निदर्शनास …

Read More »

त्या घटनेविरोधात कुद्रेमनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे!

बेळगाव (वार्ता) : कुद्रेमनी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील यांना अवमानकारकरित्या अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. एका महिलेने अर्वाच्च शिवीगाळ केलेली असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. सदर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत ठरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले …

Read More »

स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

उचगाव : गुरु शिष्याचे नाते हे प्राचीन काळापासून चालत आले आहे. प्रगत तंत्रज्ञानात गुरूंचा आदर व्यक्त करण्यासाठी केलेला हा सोहळा पाहून आम्ही धन्य झालो. शिष्यांच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु शिष्य नाते हेच सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 130 या …

Read More »

म. ए. समितीच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकार्‍यांसमवेत विविध विषयांवर चर्चा

बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज दुपारी बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्नाबाबत चर्चा केली. कासरगोड जिल्ह्यातील कन्नड भाषिक अल्प संख्याकांचे संदर्भात केरळ सरकारने अल्पसंख्यांक आयोगाला दिलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. …

Read More »

आडमार्गाने कर्नाटक हद्दीत प्रवेश करू पाहणाऱ्या दोन खाजगी बसेसवर कारवाई

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेकपोस्ट नाक्यावर कोरोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच कर्नाटक हद्दीत प्रवेश दिला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सीमावर्ती चेकपोस्टच्या ठिकाणी कडक तपासणी करण्यात येत आहे, तथापि काही वाहनचालक ही तपासणी चुकविण्यासाठी आडमार्गाने कर्नाटक …

Read More »

महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : महिला आघाडीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम महिला आघाडीच्या शनिवार खुट हॉलमध्ये कोविड नियमांचे पालन करून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीनिवास जाधव आणि डॉक्टर नाझीब कोतवाल उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात अर्चना देसाई यांच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फोटो पूजन आणि …

Read More »

केपीटीसील एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार

17 जणांविरुद्ध गुन्हा बेळगाव : बेळगाव शहरातील नेहरूनगर येथील केपीटीसील एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माजी अध्यक्षासह एकूण 17 जणांविरुद्ध सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केपीटीसील एम्पलॉइज को-ऑप. क्रे. सोसायटीचे विद्यमान सचिव सुरेश …

Read More »

उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्काराबद्दल एम. व्ही. हिरेमठ यांचा जिव्हाळा फाउंडेशनतर्फे सत्कार

बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल एम. व्ही. हिरेमठ यांचा जिव्हाळा फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्त रविवारी हॉटेल संकम येथे जिव्हाळा फाउंडेशनच्यावतीने …

Read More »

समितीचे नेते मदन बामणे यांना सहा खटल्यात जामीन मंजूर

बेळगाव : 18 डिसेंबर रोजी दंग्याचे कारण दाखवून शुभम शेळके व अंकुश केसरकर यांच्यासह 38 जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्या 38 जणांनी तसेच जे अटक नाहीत त्या सर्वानी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली पण 31 डिसेंम्बर 2021 रोजी 42 जणांची याचिका आठवे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली, …

Read More »