Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगाव

कॉर्पोरेट कंपन्यांच्या विरोधात बेळगावात आंदोलन

  बेळगाव : बेळगावात कर्नाटकातील विविध संघटना, शेतकरी संघटना, कामगार संघटना, अंगणवाडी सेविकांच्या संघटना, सीआयटीसह अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आंदोलन छेडून राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत कॉर्पोरेट कंपन्यांना संधी देणाऱ्या सरकारविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी बोलताना शेतकरी नेते सिद्धाप्पा मोदगी …

Read More »

लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : सालाबादप्रमाणे बेळगाव शहर व उपनगरात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी उपस्थित होणाऱ्या विविध मुद्यांसाठी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन कुमार गंधर्व येथे नुकतेच निवेदन देण्यात आले. गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शहरातील व उपनगरातील विविध मंडळांना विविध प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात या पार्श्वभूमीवर लोकमान्य गणेशोत्सव …

Read More »

लोंढा-वास्को रेल्वेमार्गावर मालगाडीचे 16 डबे घसरले

  खानापूर : लोंढा-वास्को लोहमार्गावरील दूधसागर ते सोनवणेच्या मध्ये मालवाहू रेल्वेचे 16 डबे घसरले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. दूधसागर ते सोनवणे या मार्गावरील 15 नंबर बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली. वास्को येथून तोरंगळ होस्पेट …

Read More »

डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांची बदली

  बंगळुरू : बेळगाव गुन्हे आणि वाहतूक विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांची बदली करण्यात आली असून निरंजन राजे आरस हे नवीन डीसीपी असतील. स्नेहा यांची लोकायुक्त एसपी म्हणून बदली करण्यात आली आहे. लोकायुक्त एसपी म्हणून रामनगराचे अतिरिक्त एसपी लक्ष्मीनारायण, रामनगराचे अतिरिक्त एसपी एनएच रामचंद्रैया, तुमकूर अतिरिक्त एसपी म्हणून चित्रदुर्गचे …

Read More »

नावगे क्रॉस जवळील आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या यल्लाप्पाच्या अस्थी कुटुंबीयांकडे सुपूर्द

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम इंटरनॅशनल या कंपनीला आग लागून मृत्युमुखी पडलेला तरुण कामगार यल्लाप्पा सन्नगौडा गुंड्यापगोळ याचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, बचाव कार्य करणाऱ्या पथकाने मृत कामगार यल्लाप्पा गुंड्यापगोळ याच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांकडे …

Read More »

सुट्ट्या भरून काढण्यासाठी आता शनिवारी भरणार पूर्ण दिवस शाळा

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे गेल्या 22 ते 27 जुलै 2024 या कालावधीत बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सदर सहा दिवसांची सुट्टी संबंधित सर्व शाळांनी येत्या दि. 10 ऑगस्ट ते दि. 21 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर शनिवारी भरून काढावी, असा …

Read More »

खेळाडू सूर्यकांत देवरमणी यांना आर्थिक मदतीची गरज

  बेळगाव : भारतीय संरक्षण सेवेतील निवृत्त कर्मचारी सूर्यकांत देवरमनी यांना स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक मास्टर्स ऍथलेटिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. निवृत्त भारतीय संरक्षण सेवेतील कर्मचारी सूर्यकांत देवरमणी हे 72 वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू असून त्यांची गोटेनबर्ग, स्वीडन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक मास्टर्स ऍथलेटिक चॅम्पियनशिपसाठी …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे नुकताच इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेण्यात आला. शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. कल्लाप्पा देसूरकर हे अध्यक्षस्थानी होते तर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून ओलमनी हायस्कूलचे शिक्षक श्री. अजित सावंत हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे …

Read More »

अहो आश्चर्यम….! गाभण न जाताच वासरू देऊ लागले रोज दूध! कुठे घडला प्रकार?

  बेळगाव : गाभण न जाताच २८ महिन्यांचे वासरु (पाडी) रोज दोन लिटर दूध देत आहे. हा आश्चर्यजनक प्रकार बेळगाव सीमा भागासह चंदगड तालुक्यात कुतूहल व चर्चेचा विषय ठरला आहे. बिजगर्णी (ता. जि. बेळगाव) येथील सदानंद मोरे यांच्या गाईची ही पाडी २८ महिन्यांची असून ती अद्याप एकदाही गाभण गेलेली नाही …

Read More »

सुळेभावी गावातील “त्या” दुर्दैवी महिलांच्या कुटुंबीयांची डॉ. सोनाली सरनोबत यांनी घेतली भेट

  बेळगाव : सुळेभावी गावातील दोन महिला विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्या. याची माहिती मिळताच कर्नाटक भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सुळेभावी गावातील कलावती मारुती बिदरवाडी आणि सविता फकिराप्पा वटी या दोन महिला गावातील मंदिराची साफसफाई करत असताना विजेचा …

Read More »