बेळगाव : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांना कर्नाटक सरकारचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराने बेळगाव येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला आहे! मराठा मंडळ ही कर्नाटकातील भाषिक अल्पसंख्याक अग्रगण्य शिक्षण संस्था …
Read More »काळ्या दिनानिमित्त बेळगावात सायकल फेरी व जाहीर सभेचे आयोजन; सहभागी होण्याचे बेळगाव शहर आणि तालुका समितीचे आवाहन
बेळगाव : भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक नोव्हेंबर 1956 मध्ये भारतातील राज्यांची भाषावार पुनर्रचना झाली याच दिवशी पूर्वीच्या मुंबई राज्यातील बेळगाव कारवार आणि हैदराबाद मधील बिदर जिल्ह्यातील काही मराठी भाषिक प्रदेश त्या वेळेच्या म्हैसूर राज्यात घालण्याची शिफारस राज्य पुनर्रचना आयोगाने जाहीर केली होती. मराठी भाषिकावर झालेला हा अन्याय दूर करून घेण्यासाठी …
Read More »काळा दिन गांभीर्याने पाळा; बेळगाव तालुका समितीचे आवाहन
बेळगाव : १ नोव्हेंबर हा सीमाभागमध्ये मराठी भाषिक काळा दिन म्हणून गेली ६९ वर्षे पाळत आहेत. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग राज्य पुनर्रचनेवेळी केंद्र सरकारने अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यामध्ये डांबण्यात आला आहे. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिक केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हा दिवस …
Read More »कर्नाटकी पोलिसांची दांडगाई; शुभम शेळकेंवर पाच लाख दंडाची कारवाई
जिल्हा सत्र न्यायालयात वकील महेश बिर्जे यांनी दिले आव्हान बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागचे अध्यक्ष व युवा नेते श्री. शुभम शेळके यांना बेळगाव पोलीस प्रशासन येनकेन प्रकारे अडकवण्याचा डाव आखत आहे, यावेळी त्यांनी नवीन डाव आखला असून प्रतिबंधात्मक सूचनेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाच्या शिफारशी वरून तब्बल …
Read More »काळ्या दिनाच्या मूक मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा; म. ए. समिती महिला आघाडीचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीने येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘काळा दिना’संदर्भात नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. सन १९५६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून कर्नाटक राज्याच्या स्थापनेची घोषणा केली आणि हा न्याय्य सीमाभाग कर्नाटकात जबरदस्तीने डांबण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सीमाभागातील २५ लाखांहून …
Read More »“ज्वाला” दिवाळी अंकाचा दिमाखात प्रकाशन सोहळा संपन्न
बेळगाव : मराठी भाषेशी आपली नाळ कायम जपत, वैविध्यपूर्ण साहित्य लेखी स्वरूपात समाजासमोर सादर करणे ही मोठी जबाबदारी आहे. मातृभाषेवर असणारे प्रेम आणि सीमा प्रश्नाबद्दल असणारी आस्था खूप मोठी आहे म्हणूनच आजच्या धावपळीच्या युगात देखील बेळगाव वार्ता “ज्वाला” या दिवाळी अंकाच्या माध्यमातून साहित्याचा खजिना आपल्या वाचकांपर्यंत उपलब्ध करून देत …
Read More »तन्मयी पावले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेची बुद्धिबळपटू तन्मयी संभाजी पावले हिने 17 ऑक्टोबर सौंदत्ती मुन्नवळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले असून हासन येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक …
Read More »राज्यस्तरीय विविध जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा हॉस्टेलच्या जूडो खेळाडूंचे यश
बेळगाव : गेल्या महिन्यात 7 आणि 8 सप्टेंबर रोजी रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी येथे पार पडलेल्या कर्नाटक राज्य जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा हॉस्टेलचे खेळाडू तुकाराम लमाणी, वैभव पाटील, नेत्रा पत्रावळे, अंजली पाटील, दर्शन पाटील, धनुष्य एल. यांनी सुवर्णपदके जिंकून उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली …
Read More »मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांचा माहेश्वरी अंधशाळेत अभ्यास दौरा
बेळगाव : दिनांक 28.10.2025 रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माहेश्वरी अंधशाळेत अभ्यास दौरा होता. तेथील विद्यार्थ्यांचे काम, शिकण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत, त्या विद्यार्थ्यातील शिस्त या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिल्या. अंधत्वावर मात करून शिकण्याची जिद्द मुलांमध्ये असते. याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली. अभ्यासाबरोबरच मुले संगणक, बुद्धिबळ, क्रिकेट हे खेळ खेळतात. …
Read More »काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार
बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री बालशिवाजी वाचनालय, येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबर ‘काळा दिन’ गांभीर्याने पाळण्याबाबत आणि त्या निमित्त आयोजित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta