Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांची मोदगा, माविनकट्टीतील मंदिरांना आर्थिक मदत

  संबंधित मंदिर प्रशासनाकडे धनादेश सुपूर्द बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आ. लक्ष्मी हेब्बाळकर आमदार निधीतून मतदारसंघातील मंदिरांसाठी आर्थिक मदत देत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज शनिवारी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते मोदगा येथील हनुमान मंदिर आणि माविनकट्टीतील रेणुकाचार्य मंदिरासाठी आर्थिक मदतीचा धनादेश संबंधित मंदिर …

Read More »

प्रलंबित मागणीची पूर्तता : होन्नीहाळ ग्रामस्थांतर्फे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सन्मान

  बेळगाव (प्रतिनिधी) : दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर होन्नीहाळ (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या होन्नीहाळ गावातील श्री हनुमान नगर (डिफेन्स कॉलनी) येथे आज आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेल निमंत्रकपदी अमित देसाई यांची निवड

  मुंबई : मुळचे बेळगाव भांदूर गल्ली येथील रहिवासी आणि सध्या पुणे येथे नामवंत आयटी कंपनीत काम करीत असलेले युवा कार्यकर्ते अमित देसाई यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियंता सेल निमंत्रकपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शना नुसार अमित देसाई यांची निवड करण्यात आली …

Read More »

“बेळगाव वार्ता” उत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धा- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

  बेळगाव : बेळगाव वार्ता आयोजित व किरण जाधव प्रायोजित उत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धा- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांनी केले. यावेळी बोलताना …

Read More »

शांतीनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिर येथे कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात

  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिर येथे कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर आकर्षक रांगोळी आणि दिव्यांनी सजविण्यात आले होते. शांतीनगर महिला मंडळाच्या सर्व सभासद भगिनींनी संपूर्ण मंदिरात दिव्यांची रोषणाई केली होती. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, सौ.मधूश्री पाटील, सौ. विजया निलजकर, सौ.रूपा कोटरस्वामी, …

Read More »

मार्ग चोर्लाचा, लाभ कोणाला?

  खानापूर : बेळगाव- चोर्ला राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची मागणी काही हॉटेल व्यावसायिक जांबोटी भागातील नागरिकांना हाताशी धरून करताना दिसत आहेत. राष्ट्रीय महामार्ग झाला तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात तसेच पर्यावरण लवादाकडे देखील धाव घेतली आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी अनमोड मार्ग, हेमाडगा मार्ग …

Read More »

गांजा प्रकरणातील आरोपीचा पोलिस ठाण्यात मृत्यू 

  बेळगाव : गांजा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या आरोपीचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरात घडली. गांजाच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी गावातील बसगौडा इरनगौडा पाटील (वय 45) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. हिंडलगा कारागृहातून चौकशी करण्यात …

Read More »

बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; दोन अट्टल घरफोड्यांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईत बेळगावमधील दोन अट्टल घरफोड्यांना अटक करण्यात आली असून दोन्ही चोरांकडून लाखो रुपयांच्या दागिन्यांसह इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरात ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरांना बेळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावमध्ये चोरी करून गोव्यात कसिनोमध्ये मजा मारणाऱ्या दोन्ही चोरांकडून सुमारे …

Read More »

सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी राजकुमार पाटील तर व्हा. चेअरमनपदी सतीश पाटील

  बेळगाव : येळ्ळूर येेथील सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजकुमार क. पाटील व व्हा. चेअरमन पदी श्री. सतीश बा. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सन्मित्रच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सन् 2022-23 ते 2026-27 सालाकरिता पुढील 5 वर्षासाठी हा कार्यकाळ राहील, असे ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे ‘आनंदमेळा’चे आयोजन

  बेळगाव : नोव्हेंबर 18, 19 व 20 असे तीन दिवस दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत रामनाथ मंगल कार्यालय, टिळकवाडी येथे खाद्य जत्रा/ ‘आनंद मेळा’चे आयोजन शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे केले जाणार आहे. विविध चटपटीत व रुचकर शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन मनपसंद कपड्यांच्या तसेच अनेक आकर्षक वस्तूंच्या खरेदीचा …

Read More »