Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

प्रादेशिक आयुक्त आणि बिम्स संचालक आदित्य आम्लान बिश्वास यांची बदली

बेळगाव : सीनियर आयएएस अधिकारी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बिम्सचे संचालक असलेले आदित्य आम्लान बिश्वास यांची बेळगावमधून बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. सोमवारी सायंकाळी कर्नाटक राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला असून त्यात बेळगावचे प्रादेशिक आहेत आयुक्त आदित्य आम्लान बिश्वास यांचा समावेश आहे. विश्वास …

Read More »

आ. श्रीमंत पाटील यांच्यामुळे कागवाड मतदारसंघात विकासगंगा

मराठा महासंघ उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव : दिशाभूल न करण्याचे आवाहन अथणी : कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार श्रीमंत पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे मतदारसंघांमध्ये विकासगंगा वाहत आहे. दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. ते पार्थनहळी येथे पत्रकारांशी …

Read More »

आमच्यावर अन्याय झाला तर बोम्मई सरकार पाडू : बेळगावात बेडजंगमांचा इशारा!

बेळगाव : बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी ऑल कर्नाटक फेडरेशन ऑफ बेडजंगम संघटनेच्या वतीने बेळगावात आज आंदोलन करण्यात आले. बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी अखिल कर्नाटक बेडजंगम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. डी. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूमध्ये आंदोलन सुरू आहे. याशिवाय राज्यातील विविध भागात …

Read More »

अंगणवाडी सेविकांचे खासदारांच्या घर-कार्यालयासमोर निदर्शने

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आज आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी खासदारांनी आवाज उठवून केंद्र सरकारकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदारांना निवेदन दिले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज बेळगाव येथे आंदोलन केले. …

Read More »

ग्रीन कॉरिडॉरने हृदय प्रत्यारोपणासाठी आणले बेळगावात

बेळगाव : एका अपघातामुळे धारवाड येथील एसडीएम हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये जीवन–मृत्यूच्या संघर्षात झुंजणाऱ्या १५ वर्षीय मुलीने अवयवदान करून ४ जणांचे प्राण वाचवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. अपघातात मेंदूला इजा झाल्याने धारवाडच्या रुग्णालयात दाखल झालेल्या १५ वर्षांच्या मुलीच्या हृदयाचे बेळगावातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल एका रुग्णावर प्रत्यारोपणाचे …

Read More »

…तर पालिकेसमोर कचरा टाकू : नगरसेविका वाणी जोशी यांचा इशारा

  बेळगाव : कुंदानगरी बेळगावात कचरा विल्हेवाटीची समस्या मोठी डोकेदुखी बनली आहे. खुद्द नगरसेवकांनीच मनपाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.होय, महापालिकेच्या प्रभागातील कचरा उचलण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. दर चार दिवसांनी घरोघरी कचरा नेणे टाळावे आणि तो दररोज किंवा दुसऱ्या दिवशी उचलावा, अशी नगरसेवकांची मागणी आहे. पण …

Read More »

पंढरपूर अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार; दिव्यांअभावी मोबाईल टॉर्चमध्ये अंत्यविधी

बेळगाव : पंढरपूरला जाताना रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेले बेळगावचे फ्रीलान्स छायाचित्रकार राजू शिंदोळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानात दिव्यांअभावी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. राजू संभाजी शिंदोळकर आणि परशुराम संभाजी झंगरुचे हे शनिवारी सायंकाळी एकादशी निमित विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी कारमधून बेळगावहून निघाले असताना पंढरपूर-सांगोला मार्गावर कासेगाव फाट्यावर कार उलटून …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही : मंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात होणार पाऊस हा बहुतांशी लोकांना त्रासदायक ठरतो. मात्र जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही. पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या आहेत असे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले की, कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. दोन दिवसांपूर्वी आम्हाला …

Read More »

इनरव्हील क्लबचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा शालिनी अनिल चौगुले आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कण्णावर यांच्यासह अन्य नव्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. आदर्शनगर हिंदवाडी येथील आयएमईआर ऑडिटोरियममध्ये गेल्या शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून अध्यात्मिक गुरु उषा हेगडे तर सन्माननीय अतिथी म्हणून इनरव्हील असोसिएशन सेक्रेटरी …

Read More »

गुन्हेगारीच्या विळख्यात बेळगाव

  रोजचे वृत्तपत्र वाचावयास घेतले किंवा वृत्तवाहिन्या पाहू लागताच डोळ्यासमोर येते ते गुन्हेगारीबाबतचे वृत्त. खून करणे ही आता अतिशय सामान्य गोष्ट झालेली आहे की काय, असे वाटावे अशी परिस्थिती आज बेळगाव परिसरात निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत बारा खून झाल्याची नोंद पोलीस खात्याने केली आहे. सुपारी घेऊन खून …

Read More »