बेळगाव : भोज गल्ली शहापूर येथील रहिवाशी, श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता अभिजीत पुजारी (वय 26) यांचे हृदविकाराने मंगळवारी अकाली निधन झाले. अभिजीत हा युवक मनमिळावू स्वभावाचा म्हणून लोकांच्यात परिचित होता त्यामुळे त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता. श्रीराम सेना हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि चंद्रकांत कोंडुसकर …
Read More »इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा 10 व 11 फेब्रुवारीला
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्रीकृष्ण यात्रा महोत्सव 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. 10 फेब्रुवारी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून यात्रेस प्रारंभ होईल. शहराच्या विविध भागात फिरून सायंकाळी साडेसहा वाजता रथयात्रा इस्कॉनच्या पटांगणावर पोहोचेल. तेथे विविध कार्यक्रमांचे …
Read More »आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विजय
बेळगाव : सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह संस्था म्हणून नावाजलेल्या अनगोळ रोड येथील दि. आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्वच्या सर्व पंधराही जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला. सामान्य गटाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आप्पासाहेब लक्ष्मण गुरव 606, अमरनाथ कृष्णा फगरे 530, अवधूत मुकुंद परब 523, …
Read More »आशा कार्यकर्त्यांचा विविध मागण्यांसाठी जिल्हा पंचायतीवर धडक मोर्चा
बेळगाव : आरोग्य खाते आणि सामान्य जनतेतील दुवा म्हणून कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा पंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील शेकडो आशा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले त्यामध्ये प्रामुख्याने आशा कार्यकर्त्यांना मासिक 15000 वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य …
Read More »झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी प्रयत्न : आ. राजू सेठ
बेळगाव : बेळगावातील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना सरकारी योजनेतून घरे देण्याच्या मागणीचे निवेदन आज बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांना देण्यात आले. झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यासाठी अनेक झोपडपट्टीवासीय आज महानगरपालिकेत आले होते. मात्र त्यावेळी मंत्री जारकीहोळी अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार …
Read More »मिनी मॅरेथॉनमध्ये अनुज पाटील, नकोशा मंगनाकर विजेते
बेळगाव : मच्छे येथे ब्रह्मलींग यात्रेनिमित्त फिट इंडिया युवा संघ यांच्यावतीने आयोजीत मिनी मॅरेथॉन शर्यत काल रविवारी उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. सदर शर्यतीतील खुल्या मुला -मुलींच्या गटाचे विजेतेपद अनुक्रमे अनुज मारुती पाटील (गणेशपुर) आणि कु. नकोशा महादेव मंगनाकर (मच्छे) यांनी पटकाविले. सदर मॅरेथॉन शर्यतीत विविध खेड्यातील 100 हून …
Read More »कॅम्प येथील वृद्ध महिलांना एंजल फाउंडेशनची मदत
बेळगाव : कॅम्प येथील दोन असह्य वृद्ध महिलांना एंजल फाउंडेशनच्या वतीने मदत देण्यात आली आहे. कॅम्प येथे एका त्या घरामध्ये दोन महिला रहात होत्या तसेच त्यांची परिस्थिती देखील बिकट बनली होती. ही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या महिलांशी बोलून अडचणी समजून घेतल्या आणि एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांना फोन …
Read More »खासगी शाळेची बस उलटली; विद्यार्थी सुखरूप
अथणी : तालुक्यातील शेगुणसी गावात एका खासगी शाळेची बस पलटी झाली. सुदैवाने अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरूप बचावले. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह 10 विद्यार्थी होते. सुदैवाने बस पलटी झाल्याने कोणतीही हानी झाली नाही. तालुक्यातील अनेक भागात खासगी कंपन्यांनी डोके वर काढले असून बसचालकांना …
Read More »वंटमुरी प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बेळगाव : न्यु वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून आता कर्नाटक सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय …
Read More »गॅस सिलिंडरच्या स्फोटात बालकासह 7 जण जखमी
गोकाक : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळासह सात जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावात हा प्रकार घडला असून रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेल्याने स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर अचानकपणे वास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta