Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

मजगावातील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक

बेळगाव : बेळगावातील मजगाव येथील युवकाच्या उद्यमबाग येथे झालेल्या खूनप्रकरणी ४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसांपूर्वी मजगाव आंबेडकर गल्लीतील रहिवासी यल्लेश शिवाजी कोलकार या २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून उद्यमबाग पोलिसांनी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील शिवापुर येथे घरात आढळला सांगाडा

बेळगाव : झोपलेल्या अवस्थेतील व्यक्तीचा सांगाडा आढळल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर गावात उघडकीस आली आहे. त्यामुळे या गावात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील शिवापूर गावातील एका घरात एका व्यक्तीचा झोपलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळून आला आहे. त्यामुळे शिवपुरात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच प्रकाश तवनप्पा मुरगुंडी याचा तो …

Read More »

पत्रकारितेमध्ये करिअरच्या नव्या संधी उपलब्ध

बेळगाव : बदलत्या युगामध्ये सर्वच व्यवसायांचे स्वरूप बदलते आहे. त्यामध्ये पत्रकारितेचा देखील समावेश आहे. नव्या युगामध्ये पत्रकारितेची नवी आधुनिक प्रणाली विकसित होत आहे. त्यामुळे नव्या पिढीला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, असे मार्गदर्शन स्मार्टन्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी केले. येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मराठी विभागातर्फे आयोजित पत्रकारिता …

Read More »

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्यावतीने डॉ. राजश्री अनगोळ यांचा सत्कार

बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्या वतीने बालरोगतज्ञ आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी डॉ. अनगोळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन डॉक्टरीपेशा सांभाळत करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती करून …

Read More »

मर्कंटाइल सोसायटीच्या नेहरू नगर शाखेचे स्थलांतर

बेळगाव : “सहकार क्षेत्रात अनेक अडचणी असल्या तरीही रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आज या संस्थेच्या चार शाखा कार्यरत असल्या तरीही नजीकच्या काळात या संस्थेने अधिकाधिक शाखा काढाव्यात त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडल्यासारखे होईल” असे विचार बेळगावचे एसीपी …

Read More »

इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव डिस्ट्रिक्ट 317 यांच्यातर्फे आज शुक्रवारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम येळ्ळूर येथे उत्साहात पार पडला. इनरव्हील वर्षाच्या शुभारंभाचे प्रतिक म्हणून इनरव्हील क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष शालिनी चौगुले आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कन्नावर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी येळ्ळूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इव्हेंट चेअरमन सुरेखा …

Read More »

भोई गल्लीत दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना

बेळगाव : शहरातील भोई गल्ली येथील दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना कार्यक्रम आमदार, गल्लीतील पंच आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी आपल्या भाषणात, एकीचे बळ मोठे असून महिलांनी एकजुटीने कार्य करीत राहावे. मंडळातील …

Read More »

चव्हाट गल्ली येथील बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : बेळगाव शहरातील अनिल बेनके फाउंडेशन आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज चव्हाट गल्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जागतिक डॉक्टर्स डे …

Read More »

राजस्थानमधील उदयपूर येथील हत्येच्या निषेधार्थ हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीने निवेदन

बेळगाव : भारतात हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात येत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या कन्हैया लाल यांच्या हत्येचे प्रकरणाच्या आधी सुद्धा हिंदूं व्यक्तीवर या ना त्या कारणावरून सूड उगवत मुस्लिम धर्मियांनी अनेकांच्या हत्या केली आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीने त्या अपराधांना कडक शिक्षा व्हावी आणि हिंदूंना संरक्षण मिळावे …

Read More »

कालिदास दिनानिमित्त उद्या ‘कबीरनीती’ विषयावर व्याख्यान

शब्दगंध कवी मंडळ आणि सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजन बेळगाव : आषाढस्य प्रथम दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ‘मेघदूत’ सारखे महाकाव्य लिहून कालिदासानी आपली प्रचंड काव्य प्रतिभा सिद्ध केली आहे. शब्दगंध कवी मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदासानिमित्त उद्या शनिवार दि. २ जुलै …

Read More »