Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

महामेळावा खटल्यातील “त्या” कार्यकर्त्यांनाही जामीन मंजूर

  बेळगाव : डिसेंबर 2021 च्या महामेळावा खटल्यातील 29 पैकी 27 जणांना गेल्या 13 मार्च रोजी जीएमएफसी चतुर्थ न्यायालयाने जमीन मंजूर केला होता, तर बाहेरगावी असल्याने हजर न झाल्याने संतोष मंडलिक व सुरज कणबरकर यांना चतुर्थ न्यायालयाने वारंट बजावले होते. आज त्यांना 30000 च्या हमी बॉण्डवर जामीन मंजूर करण्यात आला, …

Read More »

पावसाळ्यात जीवितहानी टाळण्यासाठी कडक कारवाईची सूचना

  बेळगाव : राज्यात पावसाळा सुरू होत असल्याने अतिवृष्टी व पुराच्या स्थितीत पिकांच्या नुकसानीची स्पष्ट माहिती संबंधित जिल्हा आयुक्तांनी तातडीने मिळवावी. शेतकऱ्यांना दर्जेदार पेरणी बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत पुरविण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्या. पावसाळा, अतिवृष्टी आणि संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत त्यांनी मंगळवारी (२२ मे) …

Read More »

जिल्ह्यात २५ मे पासून बियाणे वितरण : जिल्हाधिकारी

  बेळगाव : जिल्ह्यातील शेतकरी संपर्क केंद्रांसह एकूण १७० केंद्रांवर २५ मे पासून पेरणी बियाणांचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी, कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची …

Read More »

समिती नेत्यांवरील दाव्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर

  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण करण्याबरोबरच दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवर दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज मंगळवारी होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी येत्या 26 जून 2023 रोजी होणार आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध …

Read More »

मद्यपीचे चक्क गटारीत वास्तव्य, बेळगावातील प्रकार

  बेळगाव : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा नेम नाही. मात्र बेळगावात एका तळीरामाने आगळाच प्रताप केलाय. दारूच्या नशेत त्याने चक्क 2 दिवस गटारीतच वास्तव्य केले. काही नागरिकांच्या जागरूकतेमुळे त्याला बाहेर काढण्यात आले. बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या एका गटारीत एक मद्यपी अडकल्याचे आज काही नागरिकांना दिसून आले. फुटक्या …

Read More »

शिवजयंती मिरवणूक डाॅल्बीमुक्त करण्याचा मंडळांचा निर्णय; मार्केट पोलिस ठाण्यात बैठक

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी दि. 27 मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. मिरवणुकीत कुणीही डाॅल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांंसोबत बैठक झाली. हा …

Read More »

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार

  बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घनकचरा विल्हेवाट युनिटसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांसाठी तातडीने निविदा मागवून कामाला सुरुवात करावी, काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बिल अदा करावे, अशा …

Read More »

जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक संपन्न

  बेळगाव : पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज सोमवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सभेप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावीत शहरात प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी सन्मानित

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सायंकाळी जी. जी. सी. सभागृहात आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून जी. एस्. एस्. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सहसचिव विनायक …

Read More »

केएसआरटीसी बस- कार यांच्यात भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी

  कागवाड : कागवाड तालुक्यातील ऊगार बुद्रुक गावाजवळ केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सदर घटना मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर घडली असून या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाराष्ट्रातील मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच जणांची …

Read More »