Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगाव

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती – शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संज्योत बांदेकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक …

Read More »

सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका ये पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. तसेच श्री. ए. बी. पागाद, व्ही. एस. कंग्राळकर, श्रीमती टी. वी. पाटील, श्रीमती आर. बी. लोहार, श्रीमती आर. बी. मगदूम, श्रीमती ए. …

Read More »

चिंचोक्यांचा वापर करून साकारली माळी गल्ली मंडळाने श्रीमुर्ती

  बेळगाव : एकीकडे प्रशासन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर निर्बंध घालत असतानाच माळी गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने चिंचेच्या बियांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून समाजाला वेगळा असा संदेश दिला आहे. माळी गल्ली येथील गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यावर भर देत असते. मागील वर्षी देखील या मंडळाने …

Read More »

स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे अथर्व शिर्ष पठण स्पर्धा

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र आणि श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अथर्व शिर्ष पठण स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी या स्पर्धा स्वामी समर्थ आराधना केंद्र, महाद्वार रोड बेळगाव …

Read More »

गुरु विशिष्ट पुरस्काराने प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ सन्मानित

  बेळगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोगटे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ यांना कर्नाटकातील दयानंद सागर बिजनेस स्कूल या प्रतिष्ठित संस्थेने 2024 सालचा ‘गुरु विशिष्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. प्राचार्य डॉ. वेणूगोपाल जालीहाळ हे गत 22 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या बीसीए …

Read More »

श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सह. संघाला 16.48 लाखाचा नफा

  बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 16 लाख 48 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली. संस्थेची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.04/09/2024 रोजी श्री. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. …

Read More »

अपहरण झालेल्या कित्तूर नगर पंचायत भाजप सदस्याचा पोलिसांनी लावला शोध!

  बेळगाव : कांही दिवसांपूर्वी कित्तूर नगर पंचायतीच्या भाजप सदस्याचे अपहरण झाले होते. पोलिसांनी शोध घेत अखेर त्या भाजप सदस्याचा शोध घेतला. अपहरण झालेले भाजप सदस्य नागराज असुंडी पोलिसांना सापडले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयात त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी …

Read More »

महिलांसाठी 50 टक्के सवलतीत पीठ गिरणी वाटप योजना…

  बेळगाव : येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री. रमाकांत दादा कोंडुसकर व महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना गृह उद्योग मिळावा आणि दळण दळण्यासाठी घराबाहेर जाऊ नये यासाठी पीठ गिरणी वाटप योजना सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीज स्टार …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

  बेळगाव : कोरे गल्ली शहापूर यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, महादेव पाटील, नेताजी जाधव, कोरे गल्लीचे पंच सोमनाथ कुंडेकर, राजकुमार बोकडे, शिवाजी हावळानाचे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री. मरगाळे यांनी गणेश उत्सव साजरा करताना कोणती …

Read More »

गोकाक येथील बीर सिद्धेश्वर मंदिर परिसरात भीषण हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील ममदापूर गावात रात्री भजनाचा कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीचा ऊस तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ममदापूर गावातील बीर सिद्धेश्वर मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर गच्चीवर झोपलेल्या मद्देप्पा यल्लाप्पा बनासी (४७) यांच्यावर त्याच गावात राहणाऱ्या बीराप्पा …

Read More »