Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

रोहिणी बाबुराव पाटील यांची राज्य ज्युडो प्रशिक्षकपदी निवड

बेळगाव : क्रीडा क्षेत्रातील मानाचा एकलव्य पुरस्कार विजेत्या चंदगडच्या सुकन्या सुप्रसिद्ध ज्युडोपटू रोहिणी बाबुराव पाटील यांची बेळगाव जिल्हा युवा सशक्तिकरण आणि क्रीडा खात्याच्या (डीवायईएस) राज्य ज्युडो प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.बेळगावशी निकटचा संबंध असणाऱ्या रोहिणी पाटील यांनी ‘ए’ ग्रेड एनआयएस पदविका प्राप्त केली असून त्या हिंदी भाषा घेऊन एमए. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जोल्ले यांचा प्रतिक्रियेस नकार

चिकोडी : ‘हायकमांडने सांगितल्यास राजीनामा देईल’ या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी नकार दिला. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, अफवा काय येत असतात, जात असतात असे जोल्ले यांनी सांगितले. यासंदर्भात सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, महापूर असो वा कोरोनासारखे …

Read More »

… तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ : राजकीय हालचालीना वेग बंगळूर : बी.एस. येडियुराप्पा यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जोपर्यंत भाजप हायकमांडचा विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे …

Read More »

शास्त्रीनगर भागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शास्त्रीनगर भागात गुजरात भवन येथे गौरी चाफ्याची रोपटी लावण्यात आली. शनिवारी दुपारी भर पावसात रोपटी लावताना एक वेगळाच आनंद मिळत होता. पण सोबतच सकाळी ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण तज्ञ शिवाजी दादांच्या सोबत पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी बोललेले शब्द आठवत होते. अन् त्यांना गावीच राहायला सांगून त्यांच्याशिवाय रोपं …

Read More »

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार : जयंत पाटील

सांगली : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी पाणी नियोजनबाबत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बंगळूरु या ठिकाणी बैठक होणार असल्याची माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी …

Read More »

हेल्प फॉर निडीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

बेळगाव : हेल्प फॉर निडी आणि श्रीराम सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर बेळगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी हेल्प फॉर निडीचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर, भारत नागरहोळी, निलेश पटेल, राजू बैलूर आणि अनिल अष्टेकर आदी उपस्थित होते.

Read More »

कोरोना काळात कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टचे सेवा कार्य उल्लेखनीय…

बेळगाव : दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्यावतीने वतीने कोरोना काळामध्ये मोफत रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. प्रमुख्याने बेळगाव शहरामध्ये कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहून इतर सामाजिक संस्थांनी कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवेत ठेवल्या होत्या. पण इतर आजार, प्रामुख्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायलेसिस, पॅरॅलिसिस, गरोदर स्त्रिया, आर्थोपेडिक आजार अशा 157 रुग्णांची गैरसोय दक्षिण …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्मारकात साधेपणाने साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सालाबादप्रमाणे होणार शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.प्रारंभी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून व विधिवत पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व अभिनादन करण्यात आले.यावेळी शिवरायाची आरती झाली. त्यानंतर प्रेरणा मंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर …

Read More »

मृणाल हेब्बाळकर व मित्रमंडळींकडून गणेशपुर स्मशानभूमीत साफसफाई

बेळगाव : सध्या देशात व राज्यात कोरोनासारख्या रोगराईने हैदोस घातला असून सर्वसामान्य जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुद्धा या कोरोना महामारीत आपल्या ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये कोविड आयसोलेशन किट देऊन जनतेच्या पाठीशी आरोग्य लक्ष्मी या रूपाने खंबीर उभे राहून जनतेची …

Read More »

अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून

बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ गावात, पत्नीने कट रचून तिच्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात पतीचा अडसर निर्माण झाल्याने त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ …

Read More »