Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

वादाच्या भोवऱ्यात अडकलेली खानापूर समिती!

एकीत खोडा घालणाऱ्यांना वेळीच आवरा बेळगाव : खानापूर समितीची बिनशर्त एकीची घोषणा हवेतच विरली. दि. 24 एप्रिल रोजी हब्बनहट्टी येथे म. ए. समितीची बिनशर्त एकीची घोषणा झाली खरी पण ती घोषणाही फक्त घोषणाच राहिली. 2018 च्या विधानसभेच्या वेळी दोन गटात विखुरलेली समिती एकत्र यावी यासाठी तालुक्यातील समितिनिष्ठ कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ …

Read More »

एनइपी अभ्यासक्रमात कौशल विकासावर भर असावा : डॉ. थिम्मेगौडा

पदवी अभ्यासक्रमाबाबत बेंगलोर येथे बैठक बेंगळूर : पदवी शिक्षणासाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून यापुढील भाषा अभ्यासक्रमातही कौशल विकासावर अधिक भर असावा अशी सूचना कर्नाटक राज्य उच्च शिक्षण आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. थिम्मेगौडा यांनी केली. बेंगळूर येथे आयोगाच्या कार्यालयात बुधवारी पदवी अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षाचा हिंदी अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत तज्ञ समितीची बैठक संपन्न

पुढील बैठक आठ जुलैच्या आधी होणार बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक आज सायंकाळी जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस समितीचे सभासद श्री. राम आपटे, श्री. राजाभाऊ पाटील, श्री. दिनेश ओऊळकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सौ. सुजाता सौनिक, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चा अनोखा कार्यक्रम

बेळगाव : 4 जून 2022 हा दिवस मुख्यत्वे मुलांचा संरक्षण दिवस. जोर जबरदस्तीचे बळी म्हणून जागतिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे अध्यक्ष श्री. शिव कुमार हिरेमठ, संचालक श्री. पद्म प्रसाद हुली अन्य श्री. राहुल पाटील (एनजीओ) व एसडीएमसीचे अध्यक्ष यांनी नुकतीच …

Read More »

क्रिजवाईज समूहातर्फे कामगारांच्या मुलांचा गौरव

बेळगाव : आपल्या दुकानातील कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याचा स्तुत्य उपक्रम येथील क्रिजवाईज टेलर्सच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी सोमवारी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या पाच मुलांना रोख रक्कम पुरस्कार व मिठाई देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिजवाईजचे मालक श्री. कृष्ण भट यांनी प्रतिक्षा हेगडे (महिला विद्यालय …

Read More »

विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा 22 वर्षानंतर….

स्नेह मेळावा म्हणजे, घट्ट मैत्रीचा पुरावा… बेळगाव : हिंडलगा हायस्कूल हिंडलगा, या शाळेमधूम 2000 – 01 साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना आणि स्नेहमेळावा 22 वर्षानंतर मोठ्या दिमाखदार उत्साहात संपन्न झाला. हिंडलगा गावातील सोमनाथ लॉन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर गुरजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे पाद्यपुजन …

Read More »

आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून जोमाने प्रचार

शिक्षण संस्थांसह वैयक्तिक गाठीभेटींवर अधिक भर अथणी (प्रतिनिधी) : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून विधानपरिषदेच्या दोन्ही उमेदवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. शाळा, कॉलेजमध्ये बैठका घेऊन मतयाचनेबरोबरच त्यांनी मतदारांच्या वैयक्तीक भेटींवर देखील भर दिला आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघातील भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणणार, असा विश्वास देखील …

Read More »

मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर्स हटवा

श्रीराम सेनेची आ. बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने बेळगाव : न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील लाऊडस्पीकर्स हटविण्याच्या मागणीसाठी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मशिदींवरील लाऊडस्पीकर्स हटविण्याच्या मागणीसाठी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर्स हटवून ध्वनी प्रदूषण …

Read More »

पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण करणे अत्यंत गरजेचे : डॉ. हर्षा भानू जी. पी.

प्रगतिशील-एल्गार परिषद, माजी विद्यार्थी संघटना, द.म.शि मंडळ ज्योती-बीके कॉलेजतर्फे वनमहोत्सव व व्याख्यानाचे आयोजन बेळगाव : जमिन जंगल पाणी हवा निसर्ग त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत काळाची गरज निर्माण झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि निसर्गातील चांगल्या गोष्टींचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे घ्यायला हवे. समाजामध्ये जनजागृती करून पर्यावरण विषयक अभियान राबवण्याची …

Read More »

हलगा- मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती, उच्च न्यायालयाचा आदेश

बेळगाव : हलगा ते मच्छे बायपासचे काम तात्काळ बंद करण्याचा आदेश, उच्च न्यायालयाने बजावला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तोंडघशी पडले असताना, शेतकर्‍यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 नोव्हेंबर 2021 ला सदर कामाची सुरुवात केली होती. या विरोधात शेतकर्‍यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर …

Read More »