मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला पण सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर …
Read More »शाई फेकण्याचा प्रकार असमर्थनीय; पण शाई फेक प्रकरणाचे खापर पत्रकारांवर फोडणे संतापजनकच
पत्रकारिता करणे गुन्हा आहे का? – एस.एम. देशमुख मुंबई : पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या शाईफेक प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणं संतापजनक …
Read More »चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक; शाई फेकणारे तिघे ताब्यात
पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. एका कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तिनं शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील …
Read More »लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन
मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर …
Read More »आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर या : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कर्नाटक आणि कन्नडिगांच्या दंडूकेशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना जाहीर आव्हान दिले. आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत. तुमच्यात धमक असेल, तर यावे असे जाहीर आव्हान त्यांनी …
Read More »कोल्हापूरात घुमला सीमावासीयांचा बुलंद आवाज!
महाविकास आघाडीतर्फे शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध कोल्हापूर : कर्नाटक सरकारच्या विरोधात तसेच महापुरुषांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा दुमदुमला. “नही चलेगी नही चलेगी-दादागिरी नही चलेगी”असा इशारा कर्नाटक सरकारला दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी …
Read More »निशाणी कुलूप, चावी दिल्लीत; सीमाप्रश्नावरुन राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
मुंबई : आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचा अशीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मात्र, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री काय करत आहेत? हा आमचा प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी कठोर भूमिका घेतली …
Read More »मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन
कोल्हापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्याकडून वेळोवेळी होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील शाहू समाधी स्थळ या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, …
Read More »सीमावादावर अमित शाहांच्या भेटीपूर्वी दिल्लीत महाराष्ट्राच्या बेकीचे दर्शन
ठाकरे गटाच्या विरोधाने धैर्यशील माने, श्रीरंग बारणे माघारी परतले नवी दिल्ली : कर्नाटकच्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्रात एकीचा सूर उमटत असताना राजधानी दिल्लीत मात्र आज बेकीचे दर्शन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली. मात्र, या भेटीपूर्वी ठाकरे गटाचा आणि शिंदे गटातील वाद प्रकर्षाने दिसून आला. त्यामुळे …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत सुरू
कोल्हापूर : गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सीमावाद उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवेवर विपरित परिणाम झाला होता. कोल्हापूरमधील सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. कन्नडिंगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta