Friday , April 17 2026
Breaking News

महाराष्ट्र

कर्नाटकात मास्कसक्ती, महाराष्ट्रातही होणार? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर

  मुंबई : चीनसह जगभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने बंद ठिकाणी आणि एसी रूममध्ये मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढाव्यासंदर्भातील गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारने मास्कसक्तीची घोषणा केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, बंद ठिकाणी आणि …

Read More »

बोम्मईंकडून आग लावण्याचं काम, विधानसभेत त्यांच्याविरोधात ठराव मंजूर करावा, संजय राऊतांची मागणी

  नवी दिल्ली : चीनने जगभरात घुसखोरी सुरु केली आहे. त्याच पद्धतीनं कर्नाटक राज्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी आग लावण्याचं काम करत असल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत …

Read More »

‘एजेएफसी’चे कोल्हापुरात राज्यस्तरीय पत्रकार संमेलन

२७ डिसेंबरला संमेलनाचे आयोजन  : विविध मान्यवरांची व्याख्याने कोल्हापूर (वार्ता):  पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे १७ वे प्रदेश संमेलन मंगळवारी (ता.२७) कोल्हापुर येथे  होत आहे. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यतीचे पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी …

Read More »

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी हायकोर्टानं हस्तक्षेप करू नये; आरोपींची मागणी

  मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणातील दोन आरोपींनी बुधवारी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यांच्या या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश …

Read More »

“कर्नाटकचे मुख्यमंत्री अमित शाहांसमोर खोटं बोलले, ते…”, जयंत पाटलांचा विधानसभेत मोठा दावा; फडणवीसांचं खोचक प्रत्युत्तर!

  नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमाप्रश्नी बोम्मईंनी केलेले ट्वीट्सही चर्चेचा विषय ठरले होते. बेळगाव, कारवार, निपाणी आणि सीमाभागातील इतर गावांवर कर्नाटककडून दावा सांगितला जात आहे. शिवाय सांगलीच्या जतमधल्याही ४० गावांवर कर्नाटकनं दावा सांगितला आहे. या …

Read More »

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवसैनिक आक्रमक; पोलिसांनी कोल्हापुरातच अडवले

  कोल्हापूर : कोल्हापूर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापुरातच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. कोल्हापूर पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावामुळे आम्हाला विशाळगडावर सोडलं नाही. मात्र, गनिमी काव्याने आम्ही विशाळगडाकडे जाणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील …

Read More »

बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत, संजय राऊतांचं टीकास्र

  मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात आहेत. हा वाद विकोपाला गेल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या कुरापती …

Read More »

विधान भवनावर धडकणार लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’

  नागपूर : महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केल्यानंतर ते प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रबिका या हिंदू तरुणीचे 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. ही वेळ आपल्या मुलींवर येऊ नये. तसेच दुसरीकडे देशात …

Read More »

“…हे ट्वीट नक्की कोणी केलं? पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या” एलॉन मस्कच्या पोलवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

  मुंबई : टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देईल त्याप्रमाणे आपण करू असं म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात …

Read More »

महापुरुषांचा अवमान, सीमावाद प्रश्न अन् शेतकरीही दु:खी, चहापान कसं करायचं? विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार : अजित पवार

  नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते आमदार महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. ती काही केल्या थांबायला तयार नाहीत. बरं त्याबद्दल त्यांनी आणखी माफीही मागितली नाही. दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावादाचा प्रश्न तापलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री धमकीची भाषा करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री …

Read More »