मुंबई : भविष्यात भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, अशी मागणी शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत देखील खासदारांनी व्यक्त केलं. आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या …
Read More »“धनुष्यबाणा”साठी उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगकडे धाव
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं धाव घेत कॅव्हेट दाखल केलं आहे. भाजपसोबत जात एकनाथ शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगण्याची …
Read More »कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सांगा; कोल्हापूर, सांगलीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दोन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून केली आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी या पत्रातून केली आहे. अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग न …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता अर्थ राहिला नाही: दीपक केसरकर
मुंबई: आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही असंही ते म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. …
Read More »शिवसेनेच्या आमदारांना तुर्तास दिलासा! सुनावणी होईपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणतीही कारवाई करु नये : सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या ५३ आमदारांना बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होईपर्यंत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. हे प्रकरण …
Read More »कृष्णा नदीतून कर्नाटक राज्यात ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; ग्रामस्थांमध्ये महापुराची भीती
कुरुंदवाड : कृष्णा नदी क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन २९ फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने एक फुटाने पाणी पातळी कमी होऊन ३२ फूट सात इंच इतकी पाणी पातळी झाली आहे. आज सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या …
Read More »अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तरासाठी 48 तासांची मुदत देणं हे नियमाला धरुन, सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला नरहरी झिरवाळ यांचं उत्तर
मुंबई : कायद्याप्रमाणे आपण योग्य असून शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तर देण्यासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देणं हे नियमबाह्य वर्तन नसल्याचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या नोटीसला उत्तर देताना नरहरी झिरवाळ यांनी ही भूमिका मांडली आहे. तसंच माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अवघ्या 24 तासात ते …
Read More »शिवसेनेची कोल्हापूर शहर कार्यकारिणी बरखास्त : संजय मंडलिक
कोल्हापूर : शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व बेन्टेक्स आहेत. आता जे शिवसेनेत राहिले आहेत, ते लखलखीत सोने आहे, असा टोला लगावत खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेची कोल्हापूर शहरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे आज (दि.१०) पत्रकारांशी बोलताना सांगितले. सर्व शाखांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून लवकरच नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल. …
Read More »भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू, महाराष्ट्रानंतर आता गोव्यात प्रयोग; शरद पवारांचा आरोप
औरंगाबाद: भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मध्यावधी निवडणुका होतील असं कधीच …
Read More »आंबोली घाटात पर्यटकांची हुल्लडबाजी
बेळगाव : संततदार पावसामुळे वर्षा पर्यटनाला ऊत आला आहे. निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्या जवळ पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी बेळगाव -सावंतवाडी मार्गावरील आंबोली घाटात पर्यटकांची एकच गर्दी उसळली. वाहनांची मोठी रिघ पाहायला मिळाली. वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच तळीराम पर्यटकांच्या हूल्लडबाजीमुळे ट्रॅफिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta