कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था सुरुच आहे. पन्हाळगडावरील बुरुजांची घसरण सुरूच असताना आता विशालगड किल्ल्यावर देखील असाच प्रकार आढळून आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याचा आज बुरुज ढासळला आहे. सुदैवाने पर्यटक गडावर नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गडावर जाण्यासाठी असलेल्या …
Read More »पंचगंगा नदीची पातळी 37.2 फुटांवर; 58 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ दोन फूट दूर आहे. गुरुवारी दुपारी एकवाजेपर्यंत ही पातळी 37.2 फुटांवर असून, जिल्ह्यातील एकुण 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. राधानगरी …
Read More »शिंदे सरकारची भेट; पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त
मुंबई : देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री …
Read More »आंबोली बाबा फॉल्सनजीक बेळगावच्या तरूणाना तीन वाघांचे दर्शन
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : आंबोलीमध्ये असणारा बाबा फॉल्स बघून येताना बेळगावच्या तीन तरुणांना तीन वाघांचे दर्शन घडले. बेळगावचे तीन युवक बाबा फॉल्सबघून बेळगावला सायंकाळी साडेसहा वाजता परत येत होते. त्यावेळी थोडा अंधार पडत आला होता. अंधारात अचानक त्यांना दोन चकाकणारे डोळे दिसले. ते पाहून त्यांना समजले की येथे …
Read More »पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने कार्यवाही करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
कोल्हापूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने चांगलीच नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरूच; पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर सलग तीन दिवसांपासून वरुणराजाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात सूर्यदर्शनही झालेले नाही. काहीसी उघडीप त्यानंतर पुन्हा जोरदार सरीवर सरी असा पावसाचा खेळ कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजेपर्यंत राजाराम बंधार्यावर पाण्याची पातळी 35 फुट 6 …
Read More »जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात; केसरकरांचा आरोप
नवी दिल्ली : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी …
Read More »प्रा. हरी नरके यांना ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’
कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना २०२२ सालचा ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरु, उद्धव कांबळे यांच्या निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. या प्रबोधन पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी संपादक उत्तम कांबळे व …
Read More »पूरग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणार्या पूरग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळले होते. परंतु, या शेतकर्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला. या शेतकर्यांना योजनेतून वगळले जाणार नाही, याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश देत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून केले आहे. खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी ही …
Read More »शिवसेनेचं ठरलं… राष्ट्रपती निवडणुकीत द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार!
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta