Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

शिवसेनेतर्फे कोगनोळीत महामार्गावर रास्तारोको

आरटी-पीसीआरला विरोध : पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट कोगनोळी (वार्ता) : ‘कर्नाटक सरकारचं करायचं काय, वर डोके खाली पाय‘ अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (ता. 5) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआरची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर …

Read More »

कर्नाटक एन्ट्रीसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह आवश्यक

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कर्नाटक सरकारने शनिवारी दुपारी पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश देताना आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राज्यात कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश काढला आहे. त्यांची कडक अंमलबजावणी शनिवारी दुपारपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर सीमातपासणी …

Read More »

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होण्याची शक्यता

कोल्हापूर : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी सकाळी पोकलॅडची चाचणी यशस्वी झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगी नंतर अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असून, दोन तासात वाहतूक सुरू होईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने …

Read More »

‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’

कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …

Read More »

पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …

Read More »

आषाढातही ’शुभमंगल सावधान’!

कोरोना इफेक्ट : मिळेल त्या मुहूर्तावर उडताहेत बार निपाणी : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा केल्यावरच लग्नसोहळा निश्चित केला जातो. कारण लग्न हे आयुष्यभराचे नाते असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे आता आपत्कालीन काळासाठी …

Read More »

सलग दुसर्‍या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने

घरातच नमाजपठण : गर्दी टाळण्याचे आवाहन निपाणी : मुस्लिम बांधवांकडून बुधवारी (ता.21) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बकरी ईदसंदर्भातील अधिसूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार सलग दुसर्‍या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाल्याचे भासत असले तरी अजूनही संकट …

Read More »

कोगनोळी नाक्यावरील दक्षतेमुळे कोरोना आटोक्यात

वाहनांची काटेकोर तपासणी : तालुक्याला मिळतोय दिलासा निपाणी (संजय सूर्यवंशी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी सीमा तपासणी नाका हा महत्वाचा असून गेल्या अडीच महिन्यापासून हा नाका केंद्रबिंदू बनला आहे. परराज्यातून येणार्‍या सर्वच वाहनासह नागरिकांची तपासणी करून सीमा बंदी कठोर केली आहे. त्यामुळेच कर्नाटकात कोरोनाचा …

Read More »

अन्न व औषध प्रशासनातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण

खाद्यपदार्थ विक्री व्यवसायिकांना प्रशिक्षण बंधनकारक : व्यवसायिकांना मिळणार प्रमाणपत्र निपाणी : केंद्र शासनाच्या एफएसएसएआय व फॉस्टॅक योजनेतून खाद्यपदार्थ आणि फळ विक्री व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायिकांना हे प्रशिक्षण बंधनकारक असून त्यानंतर सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. …

Read More »

म्युनिसिपल शाळेसाठी रस्त्यावर उतरणार!

डोंगरी भागातील माजी विद्यार्थ्यांचा निर्धार : ग्रामीण भागात बैठका निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागाच्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांच्यासाठी कामधेनू ठरलेल्या निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतरण करण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि पालकांची हेळसांड होणार आहे. त्यामुळे हस्तांतराचा …

Read More »