Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

कोगनोळी हायस्कूलवतीने राष्ट्रध्वज जागृत फेरी

  कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल व श्री अंबिका आदर्श विद्यालय यांच्यावतीने 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज जागृत फेरी काढण्यात आली. राष्ट्रध्वज जागृत फेरी अंबिका मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळी गल्ली, मगदूम गल्ली, सुतार गल्ली, लोखंडे गल्ली, मुख्य बस स्टॅन्ड, मेन …

Read More »

‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी ‘रवळनाथ’तर्फे निपाणीत ध्वज वितरण

निपाणी (वार्ता) : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा येथील श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील शाखेतर्फे निपाणी शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत ध्वजांचे मोफत वितरण करणेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन देशवासियांना केले …

Read More »

तरुणांनी खरा इतिहास समजून घ्यावा

कॉ. उमेश सूर्यवंशी  : निपाणीत क्रांतिदिनानिमित्त व्याख्यान निपाणी (वार्ता) : १९४२ साली महात्मा गांधीजी व अन्य नेत्यांनी इंग्रजांविरोधात करेंगे या मरेंगे अशी हाक देत क्रांतीचा नारा दिला. यातून देश स्वांतत्र्याला गती मिळाली. आजच्या तरुणांनी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. अशावेळी खरा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. …

Read More »

निपाणी पालिकेची गोंधळात अर्धा तासात सभा गुंडाळली! 

पत्रिकेवरील विषयांना मंजुरी: चर्चेसाठी वेळ न दिल्याचा विरोधकांचा आरोप निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची सभा सात महिन्यानंतर शुक्रवारी (ता.१२) सकाळी पार पडली. यावेळी मागील सभेच्या प्रोसिडिंगला मंजुरी देण्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. त्यानंतर सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर म्हणत केवळ अर्धा तासात सभा गुंडाळली. तर विषय …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेह मेळावा संपन्न

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात झाला. या वर्षाचे नियोजन करण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला होता. सर्वप्रथम सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. वाडकर …

Read More »

कोगनोळी येथे पावसामुळे घरांची पडझड

कोगनोळी : सलग आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून या घरांचा सर्व्हे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. येथील अर्चना उत्तम कागले, आप्पासाहेब लगम्माना भोजे, सागर शिवाजी पंढरे यांच्यासह अन्य ग्रामस्थांची घरे या पावसामध्ये पडले आहेत. यामुळे अनेकांचे …

Read More »

मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ पदवीने डाॅ. ऋचा चिकोडे सन्मानित

सीमाभागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी ही राखीव जागा ठेवणेची सीमावासीयाची मागणी निपाणी : महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी घेतलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत सीमाभागातील निपाणी नगरीची सुकन्या डॉ. ऋचा राजन चिकोडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन M.S. (Obst and Gynae) मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ ही पदवी …

Read More »

निपाणी शहर आणि परिसरात रक्षाबंधन साजरा

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.10) दिवसभर येथील बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी झाली होती. गुरुवारी (ता.11) सकाळी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील युवती व महिलांनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून …

Read More »

निपाणीत ’आरटीओ’ची धडक कारवाई

  वाहनधारकांनी घेतली धडकी : विविध कागदपत्रांची तपासणी निपाणी (वार्ता) : चिकोडी येथील प्रादेशिक वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी शहरात अचानकपणे गुरुवारी (ता. 11) सकाळपासून सर्वच चार चाकी वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे आठवडी बाजारा दिवशी झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये धडकी भरली होती. अधिकार्‍यांनी विविध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कागदपत्रे नसलेला व …

Read More »

रोपांना राखी बांधून अनोखा केला अनोखा रक्षाबंधन!

चाऊस भगिनींचा उपक्रम : कुटुंबातच पर्यावरणाचा वसा निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी विविध उपक्रमांनी रक्षाबंधन सोहळा साजरा झाला त्यानिमित्त प्रत्येक कुटुंबातील महिला व युतीने आपल्या भाऊरायाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. पण निपाणी येथील चाऊस कुटुंबियातील फिदा आणि सबा चाऊस भगिनींनी रोपांना राखी बांधून अनोख्या …

Read More »