Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

निपाणी तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली शिवाजी विद्यापीठचे व्ही. एन. शिंदे यांची भेट

  निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मुख्य सचिव रजिस्टर डॉक्टर व्ही. एन. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील 865 गावातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी एमबीए, बीसीए, एमसीए, बीएड यासारखे उच्च …

Read More »

माणकापूरमध्ये यंत्रमागधारकावर चाकूने हल्ला

  निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे गुरुवारी (ता.४) पहाटे एका व्यक्तीने यंत्रमागधारकावर चाकू हल्ला केला. सागर कुंभार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मनोहर कोरवी असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. जखमी कुंभार यांना चिक्कोडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संशयिताने यापूर्वी माणकापूर ग्रामपंचायत मधील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात शालेय संसद निवडणूक

  निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी तसेच शालेय प्रतिनिधींची निवड सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया आधुनिक पद्धतीची ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने पार पाडली. नूतन मराठी विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांच्याकडे विद्यार्थ्यांनी अर्ज …

Read More »

जी. आय. बागेवाडी कॉलेजचे चिखलव्हाळमध्ये बुधवारपासून विशेष श्रमसंस्कार शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे डॉ. श्रीपती रायमाने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून (ता.३) चिखलव्हाळमध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर काळात शाळा मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छता, ग्रामीण शौचालय, बेरोजगारी आणि स्वयंसेवकांद्वारे साक्षरता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. …

Read More »

आमदार सतेज पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बोरगाव येथे भेट देऊन रावसाहेब पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार बंटी पाटील यांनी, रावसाहेब पाटील हे अत्यंत संघर्षमय जीवन जगले. त्यातून आलेल्या अनुभवातून सहकार, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात यश मिळवले. कोणत्याही पदाची अपेक्षा न …

Read More »

काळम्मावाडी दुर्घटनेतील दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार

  कुटुंबीयांनी फोडला हंबरडा ; नागरिकांची गर्दी निपाणी (वार्ता) : वर्ग मित्रासमवेत काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निपाणी येथील दोन तरुणांचे पाण्यात बुडालेले मृतदेह मंगळवारी (ता.२) सकाळी एनडीआरएफ तुकडीच्या जवानांनी शोधून काढले. प्रतीक प्रकाश पाटील (वय २२) आणि गणेश चंद्रकांत कदम (वय १८ दोघेही रा.आंदोलननगर, निपाणी) अशी मृत झालेल्या युवकांची …

Read More »

निपाणी तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षपदी अजित पाटील

  कार्याध्यक्षपदी बंडा पाटील ; निपाणीतील राजवाड्यात निवडी निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रीमंत विजयराजे देसाई सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी तालुका म. ए. समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. भारत पाटील होते. महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्षपदी अजित …

Read More »

निपाणीतील दोघा मित्रांचा काळम्मावाडी धरणात बुडून मृत्यू

  आंदोलन नगरात शोककळा निपाणी (वार्ता) : येथील आंदोलन नगरातील बारावी मधील वर्गमित्र काळम्मावाडी, (ता. राधानगरी) पर्यटन करून धरण पाहण्यासाठी गेले होते. पण पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता.१) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश चंद्रकांत कदम (वय १८) आणि प्रतीक पाटील …

Read More »

तणनाशकाने हिरावला शेतमजुरांचा रोजगार

  जमिनीचे आरोग्यही बिघडले कोगनोळी : अलीकडे शेतीमध्ये तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरांपेक्षा कमी खर्चात मरणारे तण आणि दिवसभर मजुरांच्याकडून काम करुन घेण्यासाठी करावी लागणारी दगदग यामुळे प्रत्येकजण सहजासहजी उपलब्ध होणारे आणि अलीकडच्या विद्युत फवारणी पंपांच्यामुळे कमी त्रासात होणारे काम म्हणून तणनाशकच वापरु लागला आहे. त्यामुळे साहजिकच शेतमजुरांचा …

Read More »

मोफत विजेसाठी विणकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत जनस्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समस्याबाबत नागरिकांनी शहर व तालुक्यातील विविध संघटना, नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिली. माणकापूर पॉवरलूम असोसिएशनतर्फे वीज दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, विणकारांची थकीत वीज बिले माफ करावीत. २० अश्वशक्ती पर्यंत …

Read More »