निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता रविवारी (ता.५) विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात रविवारी झाली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भाविक उपस्थित होते. शनिवारी (ता. ४) सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील-भाताचा नैवेद्य दाखविला. रात्री सिध्देश्वर देवालयात वालंग जमवून ढोल वादनात बिरदेव पालखीची …
Read More »श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील जयंतीनिमित्त बोरगावमध्ये ११ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.११) अरिहंत उद्योग समूह, दक्षिण भारत जैन सभेचे ग्रॅज्युएशन असोसिएशन व भगवान वृषभनाथ कृषी कमिटीच्या संयुक्त विद्यमानाने शेतकऱ्यांसाठी किफायतशीर खर्चात उत्पादनवाढीबाबतची महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कृषी विज्ञान संत अंकुश पाटील हे शेतकऱ्याना मार्गदर्शन …
Read More »एल.पी.जी. गॅस दरवाढीच्या विरोधात शहर रिक्षा असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील एल.पी.जी. गॅस पंपावरील गॅसचा वाढीव दराच्या विरोधात शनिवारी (ता.४) तहसीलदार सुरेश मुंजे यांना निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले. शिवाय हा दर पूर्वीप्रमाणे ठेवण्याची मागणी केली. निवेदनातील माहिती अशी, केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एल.पी.जी. गॅसचा कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही, असे स्पष्टपणे …
Read More »उशिरा का होईना, फळाच्या राजाचे आगमन; निपाणीत प्रत्येक डझन ९०० ते १५०० रुपये
मागणीनुसार पुरवठा कमी निपाणी (वार्ता) : दरवर्षी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातून आंब्याची आवक सुरू होत होती. पण यावर्षी गुढीपाडव्याला आंबा पाहायला सुद्धा मिळाला नाही. पाडवा संपल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी कोकणातून निपाणी बाजारपेठेत फळांच्या राजा असलेल्या हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. सध्या बाजारात प्रति डझन ९०० ते १५०० डझन याप्रमाणे खरेदी …
Read More »बोरगाव येथील म्हैस पळविण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सूर्यवंशींची म्हैस प्रथम
निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी मागून म्हैस पळविण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर येथील निलेश सूर्यवंशी यांच्या म्हैशीने प्रथम क्रमांक मिळून १० हजार १ रुपयांचे रोख बक्षीसव ५ फुटी ढाल मिळविले. अनुज अण्णासाहेब हवले व भरत हवले यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »पिढ्यान् पिढ्या बैलगाड्यांतून होतोय ऐन उन्हात ‘भक्तीचा प्रवास’
जोतिबा यात्रेचे वेगळेपण कायम; बेळगाव मधील भाविकांनी जपली परंपरा निपाणी (वार्ता) : अनेक पिढ्यांपासून चैत्रात होणाऱ्या श्री जोतिबा यात्रेत काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. पण एक परंपरा मात्र अखंड राहिली ती म्हणजे श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी बैलगाड्यान येण्याची. बेळगाव परिसरातील अनेक गावातील भाविक पिढ्यान् पिढ्या भक्तिभावाने जपलेली ही …
Read More »दक्षिण भारत जैन सभेच्या वर्धापन दिनी बोरगावच्या मीनाक्षीताई पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचा १२७ वर्धापन दिन कोल्हापूर येथे पार पडला. त्यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मीनाक्षीताई पाटील यांचा गौरवशाली सन्मान करण्यात आला. दक्षिण भारत जैन सभा व तिची पहिली शाखा जैन महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. समारंभात अरिहंत उद्योग समूहाच्या मीनाक्षी रावसाहेब …
Read More »सर्वोत्तम श्राविका पुरस्काराबद्दल मीनाक्षी पाटील यांचा निपाणीत सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांचा निपाणी शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. सहकाररत्न उत्तम पाटील, विनयश्री अभिनंदन पाटील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत निलांबरी तारळे, यशोधन तारळे …
Read More »मनशांतीसाठी दानधर्म, परोपकार आवश्यक : राजेंद्र वडर- पवार यांचे मत
भिमापुरवाडीत अखंड हरिनाम सप्ताला प्रारंभ निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात प्रत्येकाला कामातून वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय कामातील ताणतणावामुळे अनेक व्याधी घडत आहेत. त्यापासून दूर राहण्यासाठी साधू संतांच्या सहवासात काही वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून मिळणारी शक्ती वेगळी असून प्रत्येकाने त्यासाठी भक्ती केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये देव असून त्याला …
Read More »बेनाडीत शनिवारपासून बिरदेव यात्रेनिमित्त भाकणुकीसह धनगरी ओव्यांचा कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरदेव यात्रा शनिवार (ता.४) ते रविवार (ता.५) अखेर आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धनगर समाजाचे अध्यक्ष अविनाश हजारे यांनी दिली. यात्रेनिमित्त शनिवारी (ता.४) सायंकाळी येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराजवळ परिसरातील गावातील वालंग जमणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta