निपाणी (वार्ता) : काँग्रेस हा सर्व सामान्यांचा व वचनाला जागणारा पक्ष आहे.या पक्षाने दिलेली पाच योजना पूर्णपणे राबवून दिलेले वचन पाळले आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनता काँग्रेसला विसरणार नाही, असा विश्वास माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. बोरगाव येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या …
Read More »दर वाढूनही सराफपेठेत गर्दीचा महापूर!
गतवर्षीच्या तुलनेत २० हजाराची वाढ निपाणी (वार्ता) : दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोन्या चांदीच्या वस्तूसह संसार उपयोगी साहित्याची खरेदी करतात. गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी सोने प्रति तोळा २० हजार रुपये वाढूनही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे सराफ पेठेत चैतन्याची गुढी उभारली गेली. याशिवाय इतर वस्तूंची खरेदी करण्यात …
Read More »समाजातील शांतीसाठी मठ, मंदिरांची गरज
राजू पोवार ; रासाई शेंडूरमध्ये दत्त मंदिराची वास्तुशांती निपाणी (वार्ता) : विज्ञानामुळे प्रगती होत असली तरी त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे. सध्या युवा वर्ग व्यसनाधीन होत असून त्यापासून दूर राहिले पाहिजे. सध्या मन:शांतीसाठी मठ मंदिरांची गरज आहे. त्यासाठी युवकांनी अध्यात्माकडे वळावे, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार …
Read More »पालकमंत्र्यांनी घेतली पाटील पिता-पुत्रांची भेट
निपाणी (वार्ता) : बेळगांव ज़िल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची रविवारी (ता.७) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील त्यांच्याशी विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. जारकीहोळी यांच्या भेटीमुळे राजकीय गोटातून चर्चेला ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या …
Read More »हुतात्म्यांच्या स्मारकाची उपेक्षाच!
आंदोलनाला ६ रोजी ४३ वर्षे पूर्ण;१२ शेतकऱ्यांचे बलिदान निपाणी (वार्ता) : ऐतिहासिक तंबाखू आंदोलनात १२ शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या आठवणीसाठी आंदोलन नगरात त्यांचे छोटे खाणी स्मारक केले आहे. त्या ठिकाणी प्रशस्त असे स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने दरवर्षी चर्चा केली जाते. त्यानंतर मात्र कोणतीच हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांचे हुतात्मा …
Read More »राष्ट्रीय मराठा पक्षातर्फे चिक्कोडीतून विनोद साळुंखे यांना उमेदवारी
निपाणी (वार्ता) : येथील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद साळुंखे यांना राष्ट्रीय मराठा पक्षातर्फे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्याला श्यामसुंदर गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबतचे पत्र कर्नाटक राज्य राष्ट्रीय मराठा पक्षाचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी दिल्याचे विनोद साळुंखे यांनी सांगितले. बुधवारी (ता.३) दुपारी आयोजित बैठकीत …
Read More »स्मृतिदिनाच्या जेवणावळीला फाटा; पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : येथील आऊबाई काशिनाथ मेस्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त जेवणावळीला फाटा देऊन सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजकुमार मेस्त्री आणि ॲड. दिलीप मेस्त्री परिवारातर्फे अर्जुनी येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला. यावेळी २५ हजार रुपयांची बारा फूट रोपे जेसीबीने खड्डे काढुन लावण्यात आली. याशिवाय उन्हाळा संपेपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून …
Read More »चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात समितीचा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक संपन्न निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक काल कुर्ली येथे युवा समिती अध्यक्ष बंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरवातीला बैठकिचा उद्देश युवा समिती कार्याध्यक्ष अजित पाटील यांनी सविस्तर सांगितला. होऊ घातलेली लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्वाची असून, मराठी …
Read More »दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले
दुचाकीस्वारांच्या घिरट्या : महिलांच्यात घबराहाट कोगनोळी : मागील काही दिवसांपासून कोगनोळी परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या चोऱ्यांचे प्रकार भामट्या दुचाकीस्वारांकडून पुन्हा सुरू झाले आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढला. याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाडी तालुका निपाणी येथील …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा पट्टा पडला!
गाळप आणि साखर उत्पादनात जवाहर कारखाना आघाडीवर कोगनोळी : नजिकच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. जिल्ह्यातील अथर्व इंटर ट्रेड, हमिदवाडा सदाशिवराव मंडलिक, गडहिंग्लज, बांबवडे, तांबाळे, संताजी घोरपडे, इको केन चंदगड या सात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta