बंदोबस्त कडक : आरटीपीसीआरची मागणी कोगनोळी (वार्ता) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे असून या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची मागणी करण्यात येत आहे. सोमवार तारीख 9 रोजी दिवसभरामध्ये 51 चारचाकी वाहनातून सुमारे 200 प्रवाशांनी आपला रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश …
Read More »रखडलेली घरे द्या, मगच सर्वे करा
राजेंद्र वड्डर : अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना निवेदन निपाणी : दोन वर्षांपूर्वी सन 2019 साली अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्यावेळी निपाणी तालुक्यातील पडलेल्या घरांचा सर्वे करून त्यांना नवीन घरे बांधून देण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. पण दोन वर्षाच्या काळात 594 घरे पूरग्रस्तांना बांधून देता आलेली नाही मात्र आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी काळात पडलेल्या …
Read More »हस्तांतर ठराव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन
म्युन्सिपल हायस्कूल बचाव कृती समिती : तहसीलदारांना निवेदन निपाणी (संजय सुर्यवंशी) : सत्तेच्या जोरावर निपाणी नगरपालिकेने सुस्थितीत असलेली म्युन्सिपल हायस्कूलची इमारत सरकारला हस्तांतर करून पाडण्याचा घाट घातला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले दोन्ही ठराव बुधवार (ता. 25) ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास गुरुवार (ता. 26) पासून निपाणी नगरपालिका समोर तीव्र …
Read More »शिवसेनेतर्फे कोगनोळीत महामार्गावर रास्तारोको
आरटी-पीसीआरला विरोध : पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट कोगनोळी (वार्ता) : ‘कर्नाटक सरकारचं करायचं काय, वर डोके खाली पाय‘ अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणार्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (ता. 5) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआरची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर …
Read More »पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होण्याची शक्यता
कोल्हापूर : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी सकाळी पोकलॅडची चाचणी यशस्वी झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगी नंतर अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असून, दोन तासात वाहतूक सुरू होईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने …
Read More »‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’
कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …
Read More »
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
परिस्थितीची केली पाहणी
बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व …
Read More »पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …
Read More »कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक बसेस परत महाराष्ट्रात
तपासणी कडक : महाराष्ट्रात रुग्ण वाढलेच्या कारणाने तपासणी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून मंगळवार तारीख 13 रोजी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या कर्नाटक महामंडळाच्या बसेसची तपासणी …
Read More »काळाचा घाला; देवदर्शनाहून येताना ट्रकला धडक; दोन युवक ठार
चिक्कोडी : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राष्ट्रीय महामार्गाजवळील कब्बूर टोल गेटजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26) आणि प्रमोद कऱयाप्पा नाईक (वय 26) अशी मृत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta