बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त राज्यात ३ दिवसांचा दुखवटा व्यक्त करून उद्या सरकारी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर असा शोक कालावधी जाहीर करण्यात आला असून दिवंगत ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन दिवस सर्व राज्य सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर …
Read More »कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे निधन
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मध्यरात्री २.४५ च्या सुमारास त्यांनी त्यांच्या बंगळुरू येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राजकीय क्षेत्रातील सहा दशकाच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून एस. …
Read More »निपाणी सीमेवर कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले!
निपाणी : दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित केला होता. मात्र, बेळगाव पोलिसांनी महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. विनापरवाना सुरु होणाऱ्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून बेळगावला येणाऱ्या कोल्हापूरमधील शिवसैनिकांना निपाणी सीमेवरच पोलिसांनी रोखले.यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि …
Read More »बसचा पत्रा तुटून पडल्याने महिला प्रवासी जखमी
खानापूर : खानापूर येथे झालेल्या धक्कादायक अपघाताने केएसआरटीसी बस देखभाल आणि व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. बसचा पत्रा तुटून पडल्याने दोन महिला सुदैवाने बचावल्या. निडगल येथील पद्मिनी भुजंग कदम (६५) या गोदगेरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. रुमेवाडीजवळ गाडीने भरधाव वेग घेतल्याने महिलेच्या पायाखालचे प्लायवूड निखलेले …
Read More »खानापूर तालुका समितीच्या वतीने शहरात जनजागृती!
खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही उद्या सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे …
Read More »माजी आम. डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थितीत हायटेक बस स्थानकातील नूतन “श्री गणेश हॉटेल(कॅन्टीन)चा उद्या शुभारंभ!
खानापूर : खानापूर शहरातील नूतन हायटेक बस स्थानकातील इमारतीत उभारण्यात आलेल्या श्री गणेश हॉटेल कॅन्टींगचा शुभारंभ उद्या सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर कॅन्टींगचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस पार्टीच्या सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर श्री …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी
राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार (ता. ९) पासून (ता. १९) पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. रविवारपासून सीमेवर जादा पोलिस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या …
Read More »कोविड घोटाळ्यात पैसे खाणाऱ्यांना सोडणार नाही : डी. के. शिवकुमार
कुन्हा आयोगाच्या शिफारशींबाबत बैठकीत चर्चा बंगळूर : कुन्हा यांच्या समितीच्या शिफारशीनुसार अधिकारी कोविड बेकायदेशीरतेची चौकशी करत आहेत. कोविड प्रकरणात पैसे खाणाऱ्यांना सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. न्यायमूर्ती मायकल कुन्हा चौकशी आयोगाच्या शिफारशींबाबत प्रभारी आणि अधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालाचा आढावा आणि शिफारशींबाबत उपसमितीची शनिवारी विधानसौध येथे बैठक झाली. …
Read More »स्वच्छतागृहातील पैशांची लूट थांबविण्यासाठी निवेदन
निपाणी : निपाणी येथील बसस्थानकावर कर्नाटक, महाराष्ट्रसह कोकण भागातील प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवासावेळी गैरसोय होऊ नये, यासाठी केएसआरटीसीतर्फे बसस्थानकावर शौचालये बांधली आहेत. पण, त्यांच्या वापरासाठी प्रवाशांकडून लूट केली जात आहे. ही लूट तत्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन फोर-जेआर मानवाधिकार संघटनेतर्फे परिवहन मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील माहिती अशी, बसस्थानकावर …
Read More »तळेवाडी-गोल्याळी मार्गावर वाघाचे दर्शन!
खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वाराना दिसून आला. त्यामुळे त्यांनी घाबरून जागेवरच दुचाकी थांबवली व वाघ जाण्याची वाट पाहतच लागले. परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला व हल्ला करण्यासाठी दुचाकीस्वारांच्या दिशेने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta