खानापूर : खानापूरमध्ये सलग दोन ठिकाणी घडलेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोघा चोरट्यांना अटक केली. चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. खानापूर येथील मराठा मंडळ डिग्री कॉलेजसमोर राहणाऱ्या रेखा क्षीरसागर यांच्या घरी कोणीही नसताना कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. या वेळी त्यांनी ६०.०५ ग्रॅम सोन्याचे दागिने …
Read More »खानापूरात सतरा वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
खानापूर : खानापूर शहराच्या बहारगल्लीतील एका १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.रोहन हेब्बाळी (वय १७ रा.बहारगल्ली, ता. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळताचं त्यांनी तात्काळ रोहनला खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, …
Read More »कर्नाटक राज्यातील अन्य तीन हत्तींच्या सुटकेसाठी पर्यावरण प्रेमींकडून कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
बेंगळुरू : नांदणी मठातील माधुरी हत्तीचे प्रकरण ताजे असतानाच कर्नाटक राज्यातील अन्य तीन मठामध्ये असलेल्या हत्तींच्या सुटकेसाठी पर्यावरण प्रेमींकडून कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेडबाळ, अलकनूर व रायचूर मठातील हत्तींची मुक्तता करण्यासाठी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात 3 सप्टेंबर रोजी सुनावणी …
Read More »मत घोटाळ्याची चौकशी करून सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करा : राहूल गांधी
‘मत चोरी’ च्या विरोधात बंगळूरात निषेध सभा बंगळूर, ता.८: भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) देशातील “जागा आणि निवडणुका चोरण्यासाठी” भाजपशी संगनमत असल्याचा आरोप करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ८) कर्नाटक सरकारला बंगळुर मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुर विधानसभा जागेतील “मत घोटाळ्या” ची चौकशी करण्यास आणि त्यात सहभागी …
Read More »खानापूर तहसील कार्यालयाची लोकायुक्तांकडून पाहणी
खानापूर : खानापूरमधील तहसील कार्यालयासह उपनिबंधक कार्यालय आणि एम.सी.एच. रुग्णालयाला लोकायुक्त न्यायमूर्ती सी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट दिली. या पथकाने कार्यालयांच्या कामकाजाची आणि व्यवस्थेची पाहणी केली. लोकायुक्त पथकाने सरकारी कार्यालयात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, कार्यालयातील एकूण व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयांसंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी बेळगाव …
Read More »विहिरीत पाय घसरुन पडल्याने सोसायटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील ३६ वर्षीय दिग्विजय मनोहर जाधव या तरुणाचा आपल्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दिग्विजय जाधव हे गर्लगुंजी येथील पिसेदेव सोसायटी शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय जाधव आज सकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता …
Read More »कन्नडसक्ती विरोधी मोर्चासंदर्भात माचीगड, कापोली आदी भागात जनजागृती….
खानापूर : मराठीच्या रक्षणासाठी तालुक्याच्या प्रत्येक गावातून मोर्चात मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे यासाठी अनेक ठिकाणी जनजागृती केली जात आहे त्याला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोर्चा यशस्वी होईल असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. मध्यवर्ती समितीतर्फे सोमवारी कन्नड …
Read More »कन्नडसक्ती विरोधी मोर्चास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; नंदगड येथे जनजागृती
खानापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मराठी भाषिकांच्या घटनात्मक अधिकारांवर कर्नाटक प्रशासन एक प्रकारे गदा आणत आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कन्नडसह मराठीतही शासकीय परिपत्रके मिळण्याचा अधिकार आहे परंतु कर्नाटक सरकार बेकायदेशीररित्या सीमाभागात कन्नडसक्ती करत आहे. या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …
Read More »नंदगड येथे सात वर्षीय बालकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू
खानापूर : सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुंभार गल्ली नंदगड येथे घडली आहे. वेदांत असे या दुर्दैवी बालकांचे नाव आहे. वेदांत हा घरात झोपला असता अंथरुणातच त्याला सर्पदंश झाला. ही बाब कुटुंबीयांना समजताच वेदांतच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचाराचा …
Read More »मराठीच्या रक्षणासाठी सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे : खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई
खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वच भागात विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. यामध्ये पालक व शाळा सुधारणा कमिटीने सहभागी होऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गर्लगुंजी, बरगाव, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta